सिंधुदुर्ग – तिलारी येथील आंबेली मुख्य कालवा फुटला आहे. त्यामुळे परिसरातील शेती बागायतीत पाणी घुसले आहे. हा प्रकार आज सकाळी घडला.
यात मोठया प्रमाणात परिसरातील शेतकर्यांचे शेती व बागायतीचे नुकसान झाले आहे. यापुर्वी खानयाळे व मडुर्यात असाच प्रकार घडला होता. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तिलारी कालव्याला पावसाळा सुरू झाला तेव्हापासून ठीक ठिकाणी पाणी पाझरत होते. त्या ठिकाणी प्लास्टिक कापडाने पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या.
या कुचकामी उपाय योजना करून एक प्रकारे शेती बागायती लगत घुसणारे पाणी शेतीत जाऊन वाया जात आहे. तर शासन स्तरावर योग्य ती उपाय योजना न केल्याने कालवे कोसळत आहेत.
ठेकेदारांनी निकृष्ठ कामे केल्याने हे प्रकार वारंवार घडत आहेत तरी याकडे अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष कारणीभूत ठरत आहे, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.