52 चुलीवरील नैवेद्य गणपतीला दाखवला जातो.. गावडे घराण्यांची शेकडो वर्षाची ऐतिहासिक परंपरा.. 1000 ते 1500 लोक एकाच घरांमध्ये गुण्यागोविंदाने नांदतात…

0
4504

सिंधुदुर्ग : तळकोकणात गणेशोत्सवात वेगवेगळ्या रुढी, परंपरा पाहायला मिळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात माडयाचीवाडी येथे गावडे घराण्यांची शेकोडो वर्षांपासून चालतं आलेली ऐतिहासिक परंपरा आहे. या गावडे घरामध्ये 52 चुलीची मांडणी असलेल्या 52 कुटुंब एकत्र येऊन गणेशोत्सवाचे 5 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात.

कुडाळ तालुक्यातील माडयाचीवाडी येथे गावडे घराण्याचा गेले शेकडो वर्षापासून एकच घरगुती गणेश उत्सव साजरा केला जातो पण मात्र 52 कुटुंबातील सदस्यांचा विचार जर केला तर साधारणपणे 1000 ते 1500 गावडे कुटुंबातील लोक बाहेर गावी मुंबई वगैरे राहाणारे दरवर्षी एकत्र येतात. आणि गणपती बाप्पाला दर दिवशी नैवेद्य दाखवले जातात.गावडे घराण्याचा गणपती मुर्ती घरी मूर्तिकार येऊन बनवतो. ही प्रथा गेले अनेक वर्षांपासून गावडे घराण्यामध्ये चालत आलेले परंपरा आहे. दरवर्षी एकाच पद्धतीचा गणपतीचा पेहराव असतो.तसेच फेट्याचा गणपती म्हणून ओळख आहे. त्यात कोणत्याही पध्दतीचा बदल केला जात नाही. कोकणात घरोघरी गणेशोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करतायत पण मात्र गावडे कुटुंबिय एकत्र येत एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करतात. 200ते 250 कुटुंब एकत्र येत गावडे कुटुंबिय पाच दिवस एकत्र येत गुण्यागोविंदाने गणेशोत्सव साजरा करतात.

दरवर्षी प्रमाणे गौराईचं घरी आगमन केलं जातं.त्यानंतर दुसऱ्या दिवशी वसा भरला जातो.निसर्गाच्या सानिध्यातील फळे,फुल,धान्य ,पाने वापरली जातात.तो वसा प्रत्येक पुरुषाकडे दिला जातो.त्यानंतर दुसऱ्या दिवशी वसाचा विसर्जन केल जात.सर्व महिला एकत्रपणे गुण्यागोविंदाने या घरामध्ये 5 दिवस नांदत असतात. कोणताही भांडण तंटा होत नाही.

कुटुंब खूप आहेत मात्र घरामध्ये अधिकची जागा उपलब्ध नसल्यामुळे जास्त चुली मांडू शकत नाही .त्यामुळे एका चुलीवर 10-10 लोक महिला जेवण बनवतात. अस गावडे कुटुंबिय सांगतायत.52 चुलीवर विविध प्रकारचे पदार्थ बनवून गणपतीला नैवेद्य दाखवला जातो. सर्व महिला एकत्र येत या 52 चुलीवर जेवण बनवलं जात रात्री गणपती समोर फुगड्या, भजन करून रात्र जागवली जाते .गेले अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे.तीच परंपरा एकत्रितपणे आम्ही चालू ठेवत आहेत.

कोकणात एकत्रित कुटुंब पद्धती भार कमी पाहायला मिळते. मात्र दुर्मिळ होत चाललेली एकत्रित कुटुंब पद्धत अनुभवायची असेल तर कुडाळ मधील
माडयाचीवाडी गावडे कुटुंबिय हे एक उदाहरण आहे. गेले कित्येक वर्षे एकत्रित येऊन एकाच ठिकाणी गणेशोत्सव साजरा करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here