मुख्यमंत्र्यांनी घेतले ब्रम्हेशानंद आचार्य स्वामीजींचे आशिर्वाद

0
790

 

पणजी: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज श्रीक्षेत्र तपोभूमी कुंडई येथे जाऊन परमपूज्य श्री ब्रम्हेशानंद आचार्य स्वामीजींच्या अवतरण दिनानिमित्त त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.
यावेळी स्वामीजींनी त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी आशिर्वाद दिला. मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन सचिव सतीश धोंड, मयेतील भाजपचे विजयी उमेदवार प्रेमेंद्र शेट उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्वबळावर २० जागा जिंकल्या. त्यानंतर मुख्यमंत्री प्रथमच तपोभुमीवर गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here