सिंधुदुर्गात मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार मालवण तालुक्यातील एका तरुणाला पोलिसांनी केली अटक

0
234

 

सिंधुदुर्ग – मालवण तालुक्यातील एका गावातील मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.

दरम्यान या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार सच्चिदानंद उर्फ भाई श्रीकृष्ण केळुसकर (वय 35) या तरुणा विरोधात मालवण पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सच्चिदानंद उर्फ भाई यास ताब्यात घेत रविवारी रात्री उशिरा अटक केली आहे. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांनी सोमवारी सकाळी दिली आहे.

नियंत्रण कक्ष ओरोसच्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here