सिंधुदुर्गात धुव्वादार पाऊस, मालवण तालुक्यात सर्वाधिक १९० मि.मी. पाऊस…

0
111

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गेल्या २४ तासात सर्वच तालुक्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आहे. कुडाळ वगळता सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने शतक पार केले असून मालवण तालुक्यात सर्वाधिक १९० मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी १४३ पूर्णांक ५५ मि.मी पाऊस झाला असून १ जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी ६३०.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – ११८(६४०), सावंतवाडी – १७२(७६८.३), वेंगुर्ला – १२८.४ (५१२.४), कुडाळ – ९२(५०७), मालवण – १९०(६९३), कणकवली – १४२(६९२), देवगड – १५०(६२३), वैभववाडी – १५६(६१०), असा पाऊस झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here