21.6 C
Panjim
Tuesday, February 7, 2023

सिंधुदुर्गात जमिनीच्या वादातून जेसीबीने थेट घरच केले जमीनदोस्त

- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग-वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी-हरिचरणगिरी येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.जमिनीच्या वादातून जमिन मालकाने रविंद्र कोरगावकर यांचे राहते घर थेट जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केले. हा प्रकार काल घडला. याप्रकरणी संबंधित घर मालकाचा मुलगा रूपेश याने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. त्यानुसार रमण खानोलकर, शैलेश खानोलकर, रमण यांचा मुलगा व जेसीबी चालक (दोघांचे नाव माहीत नाही) अशा चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित व्यक्तीला न्याय देण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

वायंगणी-हरीचरणगिरी येथील रूपेश रविंद्र कोरगांवकर याने वेंगुर्ले पोलीसांत दिलेल्या पाfहल्या तक्रारीत आपले जुने घर वायंगणी ग्रामपंचायत घर नंबर 659 हे घर आपले वडील रविंद्र शिवराम कोरगांवकर यांचे नावे आहे. वायंगणी-हरीचरणगिरी येथे राहणारे रमण खानोलकर हे वारंवार आमचे घरी येवुन तुमचे घर माझे जमिनीत आहे, ते खाली करा नाहितर पाडून जमिनदोस्त करणार अशी माझे वडीलांना धमकी देत असत तसेच मागील 15 दिवसा पासुन शैलेश खानोलकर हा देखील त्याचे मोबाईल क्र. 9421730706 वरून माझे मोबाईल नंबर 9657921407 वर वारवार फोन तुमचे जुने घर आमच्या जमिनीत आहे. ते खाली करा नाहितर पाडून जमिनदोस्त करणार अशी मला धमकी देत होता. दि. 7 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्याने रमण खानोलकर त्याचा पुतण्या शैलेश खानोलकर, व रमण खानोलकर यांचा मुलगा (नाव माहित नाहि) सर्व राहणार हरिचरणगिरी वायंगणी हे जे.सी.पी. घेऊन त्या जमीनीत आमचे वायंगणी ग्रामपंचायत नंबर 659 जवळ आले असता माझे आई-वडील हे त्या ठिकाणी जावून, आमचे घर पाडू नका असे त्यांना सांगितले. असता त्यांनी माझ्या आईला ढकलून देवून तो निघुन गेला. परत आलीस तर मारणार अशी धमकी दिली.
सायंकाळी सुमारे 7.30 वाजता मी घरी गेलो असताना, आमचे वायंगणी ग्रामपंचायत घर नंबर 659 हे घर पाडून जमिनदोस्त केल्याचे दिसून आले. म्हणून मी व माझ्या वडीलांनी पाडलेल्या घराचे भागांत फिरून खात्री केली असता घरात ठेवलेल्या खालील वर्णनाच्या व किंमतीच्या सोन्याचे दागिने व जुनी भांडी व कागदपत्रे वरील आरोपीत यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले. तरी माझे तु चोरीस गेलेल्या वस्तुचे वर्णन खालील प्रमाणे-30 ग्रँम वजनाची सोन्याची जुनी चैन रू.30,000, 5 ग्रँम वजनाची सोन्याची जुनी अंगुठी रू. 5000, 5 पितळीचे लहान मोठय़ा आकाराचे टोप रू. 2000, 7 लहान मोठय़ा आकाराचे जुने पितळीचे तांबे रू. 1,000, जमिनीचे व घरारासंबंधीचे जुने कागदपत्र ठेवलेली छोटी लाकडी पेटी
शनिवारी दुपारी 4 ते सायंगाळी 7:30 वाजताचे मुदतीत रमण खानोलकर (पुर्ण नाव माहित नाहि). शैलेश खानोलकर (पूर्ण नाम माहित नाहि) 3) रमण खानोलकर यांचा मुलगा (नाव नाहित नाहि) सर्व राहणार हरीचरणगिरी यांनी तालुका वेंगुर्ले यांनी व जेसीबी नंबर माहित नाहि त्यावरील चालक नाव माहित नाहि) यांनी माझे वडिलांचे नावे असलेल्या वायंगणी ग्रामपंचायत घर नंबर 659 हे घर जेसीबीच्या सहा³याने पाडून जमिनदोस्त करून वरील वर्णनाच्या किमतीच्या वस्तु चोरुन आतील सामानाचे नुकसान केल्याने माझी त्यांचे विरुध्द कायदेशीर फिर्याद आहे. वरील चोरीस गेलेल्या वस्तू मिळून आल्यास मी ओळखेन. सोबत आमचे राहते ग्रामपंचायत घर नंबर 659 चे घरपत्रकाचे उतारा सादर करीत आहे. या तक्रारीनुसार भा.द.वि. कलम 447, 380, 427 व 34 अन्वये चौघाbवर गुन्हा दाखल झाला. आहे.

सदरची तक्रार वेंगुर्ले पोलीसांत दि. 7 रोजी रात्रौ. 10 वाजता देताना रूपेश कोरगांवकर यांना न्याय मिळावा या उद्देशाने गावातील माजी पंचायत समिती सदस्य समाधान बांदवलकर, सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल, एकनाथ राऊळ, वायंगणी सरपंच सुमन कामत, उपसरपंच हर्षद साळगांवकर, दाभोली ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण बांदवलकर, वैभव हळदणकर, मनोज गोवेकर, श्यामसुंदर मुणनकर, अर्जुन कोरगांवकर, बाळासाहेबांची शिवसेनेच तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, ठाकरे शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख अजित राऊळ, अवि दुतोंडकर, काका आकेरकर, नरेश बोवलेकर, आडेली ग्रामपंचायत सदस्य तात्या कोंडसकर, श्री. बांदिवडेकर, दिपक कुंडेकर आदी वेंगुर्ले पोलीस स्टेशनच्या ठिकाणी दाखल झाले होते.

अन्यायाविरोधात दाभोली व वायंगणी ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत

या प्रकरणांत दाभोली व वायंगणी या दोन्ही गावातील लोक रूपेश कोरगांवकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकवटलेले असून त्याचा एक भाग म्हणून अन्याय होत असल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles