सिंधुदुर्गात जमिनीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी ७ जण गंभीर जखमी

0
106

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात फोंडाघाट बावीचे भाटले येथे दोन गटात जमिनीच्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटातील ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्नालयात उपचार सुरु आहेत. कणकवली पोलिसात याप्रकरणी दोन्ही गटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जमिनीच्या वादातून गेल्या १५ दिवसात हि दुसरी घटना घडली आहे.

तिघांची डोकी फुटली असून दोन जण फॅक्चर

फोंडाघाट येथे जमीन वादातून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हाणामारीत दोन्ही कुटुंबातील ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात तिघांची डोकी फुटली असून दोन जणांना फॅक्चर झाले आहे. जखमींना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पारकर व कातरुड या दोन कुटुंबात जमिनीचे वाद होते

फोंडाघाट बावीचे भाटले येथे पारकर व कातरुड या दोन कुटुंबात जमिनीचे वाद होते. या वादामुळे सायंकाळी पारकर यांच्या कुटुंबातील लोकांनी कातरुड हे राहत असलेल्या घरी जात वाद केला. त्यात दोन्ही कुटुंबात लाकडी दांडा व अन्य साहित्याच्या साहाय्याने तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही कुटुंबातील सातजण गंभीर जखमी झाल्याची माहिती कणकवली पोलिसांनी दिली आहे.

कणकवली उपजिल्हा रुग्नालयात उपचारासाठी केले दाखल

गंभीर जखमींमध्ये गणेश मधुकर पारकर (४७),ताराचंद्र मोहन पारकर ४९( दोघेही राहणार फोंडाघाट जुनाबाजार),तसेच एकनाथ धोंडू कातरुड व त्याची पत्नी शुभांगी एकनाथ कातरुड व मुलगा प्रशांत एकनाथ कातरुड (सर्व राहणार फोंडाघाट) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी कणकवली पोलिसांनी दोन्ही कुटुंबातीळ जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्नालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

पंधरा दिवसात घडली दुसरी घटना

कणकवली तालुक्यात गेल्या पंधरा दिवसात जमिनीच्या वादातून हाणामारीची हि दुसरी घटना घडली आहे. १५ दिवसापूर्वी कणकवली तालुक्यातील दिगवळे या गावी तेली आणि पवार कुटुंबात जमिनीच्या वादातून हाणामारी झाली होती. याही घटनेत दोन्ही बाजूचे ५ हुन अधिक लोक गंभीर जखमी होते. या घटनेला काही दिवस उलटताच हि दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे जिल्हा चांगलाच हादरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here