सिंधुदुर्गात उत्पादन शुल्क विभागाने पकडली १४ लाख ४० हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू अवैध दारू वव्यवसायावर केली मोठी कारवाई

0
172

 

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाने आज गोवा बनावटीच्या दारूवर आज मोठी कारवाई केली आहे. गोवा ते कोल्हापूर जाणार्‍या टेम्पोमधून तब्बल १४ लाख ४० हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू आज उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली. मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी टेम्पोसह चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

गोवा ते कोल्हापूर होत होती वाहतूक

मुंबई गोवा महामार्गावर गोवा ते कोल्हापूर जाणार्‍या टेम्पोतून दारू वाहतूक होत असल्याची खबर उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ.बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नांदगाव येथे चॉकलेटी रंगाचा आयशर टेम्पो पडकला. त्यात तपासणी केली असता रियल सेव्हन व्हिस्किच्या ३६०० सिलबंद बाटल्या आढळून आल्या. त्याची किंमत १४ लाख ४० हजार रूपये आहे.

टेम्पो व चालकाला घेतले ताब्यात

या प्रकरणी टेम्पो चालक भरत संजय चव्हाण (वय २८, रा.अदमापूर, ता.भुदरगड, जि.कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले. तसेच दारू साठ्यासह ७ लाख रूपये किंमतीचा टेम्पोही ताब्यात घेण्यात आला. या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाच्या प्रभारी निरिक्षक जी.सी.जाधव, सहाय्यक निरीक्षक जी.एल राणे, जवान एस.एस.चौधरी, जे.आर.चव्हाण, महिला जवान श्रीमती. एस.एस.कुवेसकर यांनी सहभाग घेतला होता.

सातत्याने होते मोठी वाहतूक

गेल्या दोन महिन्यात सातत्याने गोवा बनावटीच्या दारूर जिल्ह्यात कारवाई केली जात आहे. जिल्हा पोलिसांनीच दीड कोटीची दारू पकडली आहे. आता उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून आज पुन्हा मोठी कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here