22 C
Panjim
Sunday, January 23, 2022

शरद पवार लिलावतीमध्ये, रोहित पवारांसह घेतली संजय राऊतांची भेट

Latest Hub Encounter

राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या आज महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. अशातच शरद पवार यांनी शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांची लिलावती रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतलीये. शरद पवार आणि नवनिर्वाचीत आमदार रोहित पवार यांनी संजय राऊत यांची आज(दि.१२)सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास लिलावती रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. जवळपास १५ मिनिटं पवार लिलावतीमध्ये होते, यावेळी त्यांनी राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवारांसोबत खासदार सुप्रिया सुळे यादेखील होत्या अशी माहिती आहे . राऊत आणि पवार यांच्यामध्ये यावेळी काही खलबतं झाली की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पण राऊत यांच्या भेटीनंतर पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीसाठी रवाना झाल्याची माहिती आहे. सत्तास्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची आज ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवारांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक होत आहे. त्यापूर्वी शरद पवार संजय राऊत यांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचले होते. दरम्यान, शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना रात्री उशीरा फोन करुन शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याची तयारी दर्शवल्याचं समजतंय. आज, मंगळवारी मुंबईत पोहोचणारे काँग्रेसचे नेते अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाळ आणि मल्लिकार्जुन खरगे यांची शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांशी चर्चा होऊन शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याच्या मुद्यावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -