वेलकम सी एम साहेब ..राणेंच्या आमदार मुलाने केले सीएम ठाकरेंचे केले स्वागत, विमानतळाचे झाले लोकार्पण सिंधुदुर्गवासीयांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली

0
51

सिंधुदुर्ग – विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत भाजपा आमदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी केले. यावेळी उपस्थितांच्या मात्र चांगल्याच भुवया उंचावल्या. यानंतर विमानतळाच्या लोकार्पणाचा सोहळा पार पडला.

मुख्यमंत्र्यांचे हसतमुखाने केले स्वागत

राणे आणि ठाकरे यांचे विळ्याभोपळ्या चे सख्य अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. भाजपा आमदार नितेश राणे हे कायम राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडत असतात. मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी राणे कुटुंबीय सोडत नाहीत. मात्र आज चिपी विमानतळाच्या उदघाटन प्रसंगी आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आमदार नितेश राणे यांनी गुलाबपुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. जरी राजकीय वैरी असले तरी सिंधुदुर्गात आलेल्या मुख्यमंत्र्यांचे हसतमुखाने सहर्ष स्वागत करण्याची परंपरा आमदार नितेश राणेंनी जपल्याचे उपस्थितांमधून बोलले जात होते.

सिंधुदुर्गवासीयांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली

या स्वागत सोहळ्यानंतर बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचे लोकार्पण झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन संपन्न झाले आणि सिंधुदुर्गवासीयांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली. चिपी विमानतळाचे लोकार्पण झाल्याने आता सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण जगाशी जोडला गेला आहे.

राज्य व केंद्रातील नेते होते उपस्थित

यावेळी उदघाटन सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यमंत्री, नागरी विमान वाहतूक, जनरल (डॉ.) बी. के. सिंह (सेवानिवृत्त), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार, मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्यसभा सदस्य सुरेश प्रभू, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे, विधानसभा सदस्य दीपक केसरकर, नागरी विमान वाहतूक सचिव राजीव बन्सल, विधानपरिषद सदस्य बाळाराम पाटील, विधानसभा सदस्य वैभव नाईक, अप्पर मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंह, विभागीय आयुक्त कोकण विभाग विलास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, लोकसभा सदस्य विनायक राऊत, विधानपरिषद सदस्य अनिकेत तटकरे, विधानसभा सदस्य नितेश राणे, प्रधान सचिव, विमानचालन, पर्यटन व राज्य उत्पादन शुल्क मंत्री वल्सा नायर सिंह, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी दीपक कपूर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here