विद्यामंदिर हायस्कुल कणकवलीचे कला शिक्षक प्रसाद राणे यांनी बनवलेल्या मुर्त्यांची गणेश भक्तांनी केले कौतुक

0
56

 

सिंधुदुर्ग – अनेक मूर्तीशाळामध्ये विविध रुपातील बाप्पा आकार घेत आहेत. अलीकडे अनेक मूर्तिकार प्लास्टर ऑफ पॅरीसच्या रंगविलेल्या मुर्त्या किंवा दुसऱ्यांनी बनविलेल्या कोऱ्या मूर्त्यां बाहेरील जिल्ह्यातून आणून त्यांना रंग देताना दिसतात. मात्र, या प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीमुळे पर्यावरणाची हाणी होत आहे. याकडे कोणाचेच लक्ष नसते.परंतु अजूनही बरेच मूर्तिकार पर्यावरण पूरक शाडू मातीच्या मूर्ती तयार करुन आपली पारंपारीक कला जोपासत आहेत.त्यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. असेच एक मूर्तीकार म्हणजे विद्यामंदिर हायस्कुल कणकवलीचे कला शिक्षक प्रसाद राणे होय. वडिलांकडून मूर्तिकलेचा लाभलेला वारसा त्यांनी पुढे सुरू ठेवला आहे. चित्रकला, मूर्तिकला याबरोबरच त्यांचे पर्यावरण संवर्धनाविषयीचे विविध उपक्रम सतत सुरू असतात. त्यामुळे त्यांना विविध संस्थांनी अनेक पुरस्कार देऊन गौरविले आहे. त्यांच्या कणकवली टेंबवाडी येथील गणेशमूर्ती शाळेत अवलोकन केले तर पर्यावरण पूरक मूर्तीचा वेगळेपणा दिसून येतो. कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या, वजनाला हलक्या व पूर्ण विघटनशील अशा पर्यावरण पूरक गणेश मूर्ती आपल्या गणेश मूर्ती शाळेमध्ये ते गेली अनेक वर्ष बनवितात. याही वर्षी त्यांनी कागदी लगद्यापासून मुर्त्या बनवल्या त्याला भक्तांचा मोठा प्रतिसाद लाभला असल्याचे प्रसाद राणे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here