रायगड – रायगड – जिल्ह्यातील खालापूर तहसील क्षेत्रातील इर्शाळवाडी गावात भूस्खलन झाल्याची माहिती आहे. एनडीआरएफची दोन पथके मदतकार्यासाठी रवाना झाली आहेत. गावातील या भूसख्खलनात १०० हून अधिकजण मलब्याखाली आल्याची शक्यता वर्तवण्यात आहे. एनडीआरएफच्या जवानांनी आत्तापर्यंत २२ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. दरम्यान, दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाल्याची आत्तापर्यंत माहिती हाती आली आहे.
या भूस्खलन दुर्घटनेत चार जण मृत्यूमुखी पडले आहेत. गावची लोकसंख्या २३४ असून १०० जण अडकल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. पाऊस सुरू असल्याने मदत मिळण्यास अडचण येत आहे. अडीच किलोमीटर वर ही वाडी आहे. शासनाने हेलिकॉप्टर ने शोध करावे अशी मागणी ग्रामस्थांची आहे. एनडीआरएफ, पोलीस अधिकाऱ्यांसह जवळपास १०० जणांची टीम घटनास्थळी दाखल असून मदत व बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, मुंबईहूनही एनडीआरएफच्या आणखी दोन टीम घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. मध्यरात्रीच घटना घडल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
मुख्यमंत्री घटनास्थळी
खालापूर (जि. रायगड) येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवर दरड कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्याचा आढावा घेत आहेत.
प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. सर्व यंत्रणा बचाव कार्यासाठी सज्ज आहेत. एनडीआरएफ पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू असून आत्ताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची माहिती घेतली आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.