राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार नौसेना अधिकाऱ्यांची टीम सिंधुदुर्गात दाखल

0
155

 

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग किल्ल्यावर ४ डिसेंबरला नौदल दिन साजरा होत आहे. या निमित्ताने नौसेनेकडून मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येत आहे. शिवपुतळा उभारणी कामाची रविवारी नौसेनेच्या वेस्टन नेव्हल कमांड चीफ ऑफ स्टाफ व्हाईस ऍडमिरल संजय भल्ला यांनी पाहणी करत आढावा घेतला.

भारतीय नौसेना दिन किल्ले सिंधुदुर्गवर साजरा होणार असून या कार्यक्रमापूर्वी सुमारे ३५ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट समुद्रकिनारी बनविण्यात येणार आहे. राजकोट येथे शिवपुतळा परिसराच्या सुशोभिकरणासाठी आणि इतर व्यवस्थेसाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांच्या कार्यालयाकडून सुमारे पाच कोटी रुपये खर्च यासाठी करण्यात येणार आहे. राज्य शासन व नौदल विभागाने निश्चित केलेल्या जागेवर पुतळा उभारणी सुशोभिकरण होत आहे.

देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते राजकोट होत असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच अनावरण होणार आहे. भव्यदिव्य नौसेनेच कार्यक्रम होणार आहे.त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज येणार आहेत.तसेच देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,या मान्यवरांच्या उपस्थित हा नौसेना दिन साजरा होणार आहे.तसेच इतिहास अभ्यासकांची सुद्धा हजेरी लागणार आहे.1 ते 4 डिसेंबर 2023 अस नौसेनेचा सोहळा असणार आहे.पहिल्या दोन दिवसांमध्ये नौदलाच्या कवायती समुद्रामध्ये असणार आहेत. तारकर्ली, देवबाग, मालवण या समुद्रामध्ये विशेष म्हणजे आम जनतेला कवायती पहाता येण्याची शक्यता आहे.तिसऱ्या दिवशी या नौसेना कार्यक्रमाला मान्यवर हजेरी लावतील. आणि चौथ्या दिवशी देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना संबोधित करणार आहेत.

राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात सुशोभित प्रवेशद्वाराचे बांधकाम करणे भाग १ या कामासाठी २४ लाख ८५ हजार २०५ रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात सुशोभित प्रवेशद्वाराचे बांधकाम करणे भाग २ या कामासाठी २ कोटी ४० लाख ७१ हजार १६९ रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरासाठी कंपाऊंड वॉलचे बांधकाम करणे या कामासाठी २३ लाख २३ हजार २९० रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात सजावटीची भिंत बांधकाम करणे यासाठी २५ लाख ३२ हजार ३५९ रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरासाठी रस्त्याचे बांधकाम करणे यासाठी २४ लाख ४९ हजार २५४ रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात पदपथ बांधकाम करणे यासाठी २५ लाख ५३ हजार ७०८ रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात लँडस्केप करणे या कामासाठी १६ लाख २९ हजार ५७५, राजकोट मालवण येथील परिसरातील शौचालयाचे बांधकाम करणे या कामासाठी २५ लाख २८ हजार ६६३रुपये अशा प्रकारच्या टप्प्यांची कामे निश्चित केलेली आहेत.

यावेळी नौसेनेचे अधिकारी तसेच जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, प्रांतधिकारी श्रीमती कळुसे, प्रांताधिकारी पानवेकर, तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, मुख्याधिकारी संतोष जिरगे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अजयकुमार सार्वगोड, प्रदीप पाटील, ठेकेदार मिलिंद केळूसकर व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here