24 C
Panjim
Sunday, November 29, 2020

रत्नागिरीत शुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत 45 वर्षीय इसमाचा खून लॉकडाऊनमुळे उपचाराला न्यायला झाला उशीर

Must read

CM meets Amit Shah, Pralhad Joshi, Dharmendra Pradhan over mining issue

Panaji: Chief Minister Pramod Sawant on Saturday met Union Home Minister Amit Shah and Union Mines minister Pralhad Joshi over the issue of resumption...

कास्टमचा माईन गावात छापा, बंदुकीचे छरे आले आढळून

कणकवली - कस्टम अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत माईन येथील एका इसमकडून बंदुकीचे छेरे मिळून आले आहेत. संबधित व्यक्तीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असलेला वन्यजीव असल्याची खबर...

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नोकर्‍यांचे आमिष… संचालक अतुल काळसेकर यांचा आरोप

सिंधुदुर्ग - जिल्हा बँकेत सध्यस्थितीत कोणतीही नोकर भरती नाही. तसेच नोकर भरतीबाबत कोणताही निर्णय अथवा ठराव जिल्हा बँकेने घेतलेला नाही. मात्र जिल्हा बँकेची निवडणूक...

COVID-19 curbs on several activities lifted by State govt

Panaji: Goa Administration on Saturday relaxed several curbs imposed in the state due to COVID-19 outbreak allowing certain activities to be opened up with...
- Advertisement -

गुहागर तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी येथे मासेमारी करता वापरण्यात येणारे पाग विचारणा केली म्हणून झालेल्या वादाचे पुनर्वसन मारहाणीत झाले. यामध्ये 45 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

कमलाकर शंकर पारदळे, वय 45 राहणार तवसाळ तांबळवाडी असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. तवसाळ तांबडवाडी मधील मयत कमलाकर पारदळे व मारहाण करणारा संशयित आरोपी वसंत कृष्‍णा पारदळे या दोघांची घरे शेजारी आहेत. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे दोघे मित्र होते. लॉकडाऊनमुळे रोजंदारी नाही. यामुळे खाडीतील मासे पागुन त्यावर रोजच्या जेवणाची व्यवस्था हे दोघे आपल्या कुटुंबासाठी करत होते. या दोघांनी मिळून मासेमारी करता पाग घेतला होता. बुधवारी दुपारी वसंत कृष्‍णा पारदळे यांनी कमलाकर पारदळे याला पाग कोठे आहे , अशी विचारणा केली या झालेल्या बाचाबाची मध्ये मारहाणीत रूपांतर झाले. वसंत पारदळे याने काठीने केलेल्या मारहाणीत डोक्याला जबर मार लागल्याने, त्यातच कमलाकर पारदळे खाली कोसळताना दगडावर आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. लॉकडाऊन असल्यामुळे उपचाराकरता याला नेणार कसे असे दोघांच्याही कुटुंबाला प्रश्न पडला. यामुळे सायंकाळी 5 वाजता त्याच्यावर अधिक उपचारासाठी नरवण येथील एका खाजगी दवाखान्यात नेण्यात आले होते. तेथील डॉक्टरने वाहनांमध्ये त्याची तपासणी करून तो मयत झाल्याचे सांगितले. बुधवारी 3 वाजताची घटना सायंकाळी उशिरापर्यंत कोणालाही कळू दिली नव्हती. अशामध्ये गुहागर पोलिसांना समजतात गुहागर पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, गणेश कादवडकर, किरणकुमार पाटील, श्री जाधव यांनी पहाटे 3 वाजता घटनास्थळाला भेट दिली. गुरुवारी सकाळी कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात कमलाकर पारदळे याचे शवविच्छेदन करण्यात आले. गुहागर पोलिसांनी या खून प्रकरणी वसंत कृष्णा पारदळे याला अटक केली आहे. मयत कमलाकर पारदळे याला पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

- Advertisement -

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest article

CM meets Amit Shah, Pralhad Joshi, Dharmendra Pradhan over mining issue

Panaji: Chief Minister Pramod Sawant on Saturday met Union Home Minister Amit Shah and Union Mines minister Pralhad Joshi over the issue of resumption...

कास्टमचा माईन गावात छापा, बंदुकीचे छरे आले आढळून

कणकवली - कस्टम अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत माईन येथील एका इसमकडून बंदुकीचे छेरे मिळून आले आहेत. संबधित व्यक्तीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असलेला वन्यजीव असल्याची खबर...

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नोकर्‍यांचे आमिष… संचालक अतुल काळसेकर यांचा आरोप

सिंधुदुर्ग - जिल्हा बँकेत सध्यस्थितीत कोणतीही नोकर भरती नाही. तसेच नोकर भरतीबाबत कोणताही निर्णय अथवा ठराव जिल्हा बँकेने घेतलेला नाही. मात्र जिल्हा बँकेची निवडणूक...

COVID-19 curbs on several activities lifted by State govt

Panaji: Goa Administration on Saturday relaxed several curbs imposed in the state due to COVID-19 outbreak allowing certain activities to be opened up with...

Goa-Delhi biweekly trains cancelled till December

Panaji: Two Goa-Delhi biweekly trains have been cancelled till last week of December due to ongoing upgradation work of Yard remodeling at Kosikalan, Uttar...