कोंकण – महाराष्ट्रातील शिंदे- ठाकरे वादाचा निकाल आज देताना सरन्यायाधिशांनी शिंदे गटाला अभय देऊन शिंदे- फडणवीस सरकारच महाऱाष्ट्रात राहील असे निरीक्षण नोंदवले आहे. निकाल आल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेवून शिंदेंना मी सर्व काही दिले तरीही त्यांनी माझ्यावर अविश्वास ठराव आणला गेला. त्यामुळेच मी राजीनामा दिला असे त्यांनी म्हटले आहे.
आता तर खरी लढाईला सुरवात असल्याचे म्हणून अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय द्यावा असे आवाहन केले आहे. या पत्रकार परिषदेला मुंबई दौऱ्यावर असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह खासदार संजय राऊत उपस्थित होते. आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणले, आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा केवळ शिवसेनेपुरता मर्यादीत नसून संपुर्ण लोकशाही वाचवण्यासाठीचा असल्याने मला समाधान आहे. या निकालात सत्तेसाठी हपापलेल्यांचा नंगानाच कोर्टाने उघडा पाडला आहे. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयांने विऱोधकांचे वस्त्रहरण झाले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यपालांच्या निर्णयाचे धिंदवडे काढण्यात आले आहे. त्यामुळे ही यंत्रणाच संशयास्पद झाली असून त्यांना अविश्वास ठरावाचे अधिवेशन बोलवण्याचा कोणताच अधिकार नाही हे सिद्ध झाले आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय जरी अध्यक्षांकडेच नोंदवला असला तर पक्षादेश हा शिवसेनेचाच होता. त्यामुळे सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार अध्यक्षांनीही वेळ न दवडता लवकरात लवकर निर्णय द्यावा.
गद्दारांनी अविश्वास आणलेली मला आवडणार नाही. त्यामुळेच मी राजीनामा दिला. ज्यांना मी सर्व काही दिले त्यांनीच हपापलेपणा दाखवून माझ्यावर अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला हे मला परवडणारे नाही. त्यामुळेच मी राजीनामा दिला. मी जसा स्वाभिमान बाळगून राजीनामा दिला तसा राजीनामा सुप्रिम कोर्टाने ताशेरे ओढल्यामुळे शिंदे आणि फडणवीसांनी द्यावा”असे आवाहन त्यांनी विरोधकांना दिला आहे.