मुबंईला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल.. मुबंईकडे जाणाऱ्याही गाड्या रद्द सिंधुदुर्गातील रेल्वे स्टेशनवर चाकरमान्यांची मोठी गर्दी..

0
164

 

सिंधुदुर्ग: कोकणात जाणाऱ्या रेल्वे रखडल्याने प्रवाशांचा दिवा रेल्वे स्टेशनवर खोळंबा झाला होता.त्यानंतर संतप्त प्रवाशांनी रेल्वे ट्रॅक वर उतरून रेल्वे रोखून धरली.पनवेल आणि कळंबोलीच्या दरम्यान मालगाडीचे डबे घसरले होते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गाड्या उशिरानं धावत होत्या. तर आज अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी दिवा रेल्वे स्थनकात रेल रोको होता. त्याचा फटका चाकरमान्यांना बसला आहे.अनेक कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आली आहे.

लाडक्या बाप्पाचे 11 मनोभावे सेवा करून चाकरमानी आपल्या कामा धंद्यासाठी मुबंईला गेला होता.परंतु रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर गाड्या रद्द झाल्याची माहिती मिळाली. मात्र अजून कोकण रेल्वे मार्गावरून अजूनही एकही गाडी धावलेलेली नाही.11 दिवसांचे गणपतीचे विसर्जन करून गेलेला चाकरमानी कोकणच्या प्रत्येक स्टेशवर अडकून पडले आहे.सकाळपासून हे प्रवाशी ट्रेन पकडण्यासाठी स्टेशनवर आले होते.तसेच कोकणात येणाऱ्या 12 रेल्वे गाड्या रद्द झाल्या तर 3 गाड्यांचे मार्ग बदलले आहेत.कोकण रेल्वे मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोकण रेल्वे आणि तुतारी या दोन्ही गाड्या रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वेळापत्रक खोळंबले आहे.रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या उशिराने धावत आहेत त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा खेळ खंडोबा होताना पाहायला मिळत आहे.त्यामुळे कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे .काही रेल्वे स्थानकात थांबलेल्या दिसत आहे.

कोकण रेल्वे मार्गावर किती वेळाने गाड्या धावतील यांची माहिती अजूनही दिली गेलेली नाही.अजूनही चाकरमानी स्टेशनवर थांबून रेल्वेची वाट पाहत आहेत.त्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहेत.कणकवली ,कुडाळ, सावंतवाडी या सिंधुदुर्गातील स्टेशनवर मोठी पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here