मालवण तळाशील समुद्र किनारी महाकाय व्हेल मासा मृत परिसरात दुर्गंधी, विल्हेवाट लावण्याची मागणी

0
467

 

सिंधुदुर्ग – मालवण तालुक्यातील तळाशील समुद्र किनारी 40 फूट लांबीचा महाकाय व्हेल मासा मृत अवस्थेत सापडला आहे.

या माशामुळे तळाशील समुद्र किनारी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरू लागली आहे. अलीकडे कोकण किनारपट्टीवर अनेक व्हेल मासे मृत अवस्थेत सापडले आहेत. समुद्रात होणारी बेसुमार मासेमारी आणि यांत्रिक बोटीच्या माध्यमातून होणारी एलईडी मासेमारी या प्राण्यांच्या जीवावर बेतत असल्याचे जाणकार लोक सांगत आहेत. कोकणातील समुद्रात दुर्मीळ जीवांचा होणारा मृत्यू सध्या समुद्र जीव प्रेमी आणि अभ्यासक यांच्या चिंतेचा विषय बनत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here