25.7 C
Panjim
Friday, August 19, 2022

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा आरोप – सेना नेते आधी व्यापाऱ्यांची पिळवणूक करून नंतर प्रश्न सोडविण्याचे करतायत नाटक

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – जिल्हाभर गरज नसतांना सर्वत्र लॉकडाऊन लावायचे.जनतेला त्रास द्यायचा,व्यापाऱ्यांवर नाना प्रकारची बंधने घालायची आणि भाजपने व्यापाऱ्यांची बाजू घेऊन बंदला पाठींबा देताच आपणच कडक केलेले लॉकडाऊन शिथिल करण्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचा.हा सर्व प्रकार म्हणजे शिवसेना सत्ताधाऱ्यांचा ”तुघलकी कारभार” आहे.अशी टीका भजापा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली.आता लॉकडाऊनमधील शिथिलता आणण्याचा प्रकार म्हणजे आधी चूक करून नंतर ‘आम्ही करून दाखले ‘ अशी ओरड घालण्याचा प्रकार आहे. असेही ते म्हणालेत.

कोरोनाचे संकट ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकांनीच लॉकडाऊन करण्याची गरज असतांना सर्वत्र कडक बंदी केली. त्यात दारू दुकाने सुरू आहेत. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे.मात्र शेतीला लागणारी वेगवेगळी खते जिल्हयात नाहीत. त्यात लॉकडाऊन मुळे सामान्य माणूस घरा बाहेर पडू शकत नाही.या सरकारला सामान्य शेतकरी जगवायचा आहे की मारायचा ?असा संतप्त सवाल .तेली यांनी केला. व्यापाऱ्यांसोबत झूमॅटो वरून व्हिडीओ कॉन्फरन्स पालकमंत्री सामंत यांनी केली.हा झुम अँप चीनचा आहे. यातूनच तुमची देशभक्ती काय आहे ती दिसते.ऑनलाईन ऑर्डर केल्यावर फ्लीफकार्ड, अमेझॉन अशा कंपन्यांची ऑर्डर घरपोच येते. मात्र ती वस्तूं जिथून येते तो भाग मुख्य शहरांमधील कोरोनाचा रेडझोन असलेला परिसर आहे.म्हणजे बंदी कोणावर घातली पाहिजे त्यांना मोकळे सोडून सामान्य व्यापारी,शेतकरी व गरिबांना लॉकडाऊनमधे भरडण्याचे काम हे सत्ताधारी करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयात सत्ताधारी आणि शिवसेनेचे नेते प्रशासनाला हाताशी धरून आपण सत्ताधारी आहोत. वाट्टेल ते निर्णय घेऊ शकतो हे दाखविण्यासाठी असे ‘तुघलकी’ निर्णय घेत आहेत.व्यापारी आणि सामान्य जनतेवर अन्याय करण्याचे काम करत आहेत.अशी टीका त्यांनी केली.

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याच्या वलग्ना करणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या पाचवर्षात आरोग्य मंत्री पद स्वतःकडे ठेवून सिंधुदुर्गला काय दिले याचे उत्तर द्यावे.कुडाळ,देवगड, वेंगुर्ले येथे ठोकळे पद्धतीची रुग्णालये बांधलीत त्यांना प्रथम डॉक्टर द्या,आरोग्य विभागातील सिंधुदुर्गची रिक्त असलेली 534 पदे आधी भरा नंतर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधा असा सल्ला तेली यांनी दिला आहे. 19-20 सलचा जिल्हा विकासाचा आराखडा 225 कोटीचा होता.यावेळी 250 कोटीचा पाठविला मात्र मंजूर किती झाला तर फक्त 1.42 कोटी आणि त्यातही 33% कट लागला मग राहिले काय ? जिल्हयाच्या विकास कोणत्या निधीतून करणार ? चांदते- बांदा ही चांगली योजना होती ती सरकारने बंद केली दुसरी योजना फक्त कागदावरच आहे.सिंधुदुर्गचा विकास कसा करणार ? उत्तर द्या, विकासनिधी कसा आणणार ते जनतेला सांगा. असा प्रश्नही राजन तेली यांनी उपस्थित केला आहे.

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img