फडणवीस सरकारच्या कालावधीतील पोलिस भरतीबाबतचा शासन निर्णय बदलणार

0
147

 

महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील जवानांच्या भरतीचे निकष बदलण्यात येणार असून पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी आणि त्यानंतर लेखी परिक्षा असे भरती निकष राहणार आहेत. या निकषानुसार लवकरच सुमारे ११ हजार रिक्‍त जागांसाठी भरती मोहिम उघडली जाणार आहे.

यासाठी माजी मुख्मयंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील भरतीचे निकष दुरस्त करून याबाबतचा शासन आदेश गृहमंत्रालयाकडून काढला जाणार आहे. यामुळे पोलिस दलात सक्षम जवान मिळणार असून याचा लाभ ग्रामीण भागातील युवकांना होण्याची शक्‍यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाहीरनाम्यात याबाब सुतोवाच केले होते.
पोलिस भरतीसाठी सध्या प्रथम लेखी परिक्षा घेतली जाते. त्यानंतर शाररिक क्षमता सिद्ध करण्यासाठी मैदानी चाचणी घेतली जाते. दोनी चाचण्यांतील एकूण गुणांच्या आधारे अंतिम निवडीची यादी जाहीर होते. या निवड प्रक्रियेमुळे लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेले अनेक उमेदवार पुढे शाररिक चाचणीत अनुत्तिर्ण ठरत असत. मैदानी परिक्षेत त्यांना अपयश येत असे. परिणामी पोलिस दलाला योग्य आणि ताकदवर जवान मिळण्यास अडचणी भासत होत्या.
ही बाब ध्यानात आल्याने पोलिस भरतीसाठी ईच्छुक असलेल्या अनेक बेरोजगार युवा-युवतींनी अगोदर मैदानी परिक्षा नंतर लेखी परिक्षा घ्यावी, अशी मागणी केली होती. तरूणांची ही मागणी ध्यानात घेउन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना मंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर सभांत युवकांना आश्‍वासन दिले होते. पोलिस भरतीच्या प्रक्रिया दुरस्तीनंतर धावणे, गोळाफेक, लांबउडी, पुलअप्स्‌ या प्रकाराची चाचणी होणार आहे. सध्या या चाचणीतील लांब उडी आणि पुलअप्स्‌ हे दोन प्रकार वगळले आहेत. त्यांचा नव्याने समावेश होणार आहे.

या दुरुस्तीचा लाभ युवकांना तसेच पोलिस दलाला होणार आहे. या दुरस्ती निकषामुळे शाररिक क्षमतावान बल उपलब्ध होईल. तसेच याचा ग्रामीण भागातील युवकांना होणार आहे –  प्रा. भास्कर शिंदे, ज्ञानराज अकॅडमी, पोलिस भरती मार्गदर्शन केंद्र, संगमनेर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here