पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या ताफ्यत तीन वाहनांचा भीषण अपघात अपघात सिक्युरिटीच्या गाड्या एकमेकांवर आदळल्या

0
333

 

सिंधुदुर्ग – राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा आटपून रत्नागिरीच्या दिशेने जात असताना त्यांच्या ताफ्यातील वाहनांना भीषण अपघात झाला आहे विशेष म्हणजे अपघातातील तीनही वाहने ही पोलीस सिक्युरिटीची आहेत. हा अपघात मुंबई गोवा महामार्गावर खारेपाटण येथे घडला आहे.

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा आटपून रत्नागिरीच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला आहे. खारेपाटण चेक पोस्ट नजीक ही घटना घडली. आदित्य ठाकरे सिंधुदुर्गवरून रत्नागिरीला जात असताना हॉटेल मधुबन या ठिकाणी हा अपघात झाला. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या मागून संबंधित गाड्या येत असताना, एका गाडीने ब्रेक मारला असता. ताफ्यातील दोन ते तीन वाहने एकमेकांवर धडकून हा अपघात झाला. या अपघातात कोणी जखमी झाले नसले तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

अपघातग्रस्त गाड्या या या पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताब्यातील सिक्युरिटी साठी असलेल्या जिल्हा पोलिसांच्या होत्या. आदित्य ठाकरे यांच्या गाडी बरोबरच या गाड्या चालल्या होत्या. मात्र ठाकरे यांच्या गाडीला कोणतेही नुकसान पोहोचलेले नाही. काहीकाळ ताफा याठिकाणी थांबविण्यात आला, यानंतर आदित्य ठाकरे हे नियोजित दौऱ्यासाठी रत्नागिरीला रवाना झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here