नितेश राणेंचा ट्विटरबॉम्ब… दिशा सालीयान मृत्यू आणि सचिन वाझेचे कनेक्शन

0
130

 

सिंधुदुर्ग – सुशांतसिंग राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणावरून नारायण राणेंनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर हा मुद्दा परत एकदा चर्चेत आला. त्यानंतर आज सकाळीच नितेश राणे यांनी ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. दिशा सालियान मृत्यूप्रकरण आणि सचिन वाझेचं कनेक्शन असल्याचा खळबळजनक दावा नितेश राणेंनी केला आहे.

दिशा सालियान प्रकरणात मालवणी पोलिसांची भूमिका पहिल्या दिवसापासून संशयास्पद दिसतेय. आता त्यांना याप्रकरणी अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. आठ जूनच्या रात्री उपस्थित असलेला आणि दिशासोबत राहत असलेला रोहन रॉय सर्वांसमोर येऊन का बोलत नाही? दिशाला ज्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमधून मालाडला नेण्यात आले ती कार वाझेची आहे का? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.

मुंबईच्या महापौरांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहिलं. त्यावरून देखील नितेश राणे यांनी टीका केली आहे. मुंबईच्या महापौरांनी दिशा सालियान प्रकरणात मालवणी पोलिसांनी अहवाल सादर करण्यास सांगितला. तसेच राज्य महिला आयोगाला पत्र लिहिलं. यावरून ८ जूनच्या रात्री काहीच घडलं नाही, असं दाखवून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण असं करून ते स्वतःसाठीच खड्डा तयार करत आहेत, असंही नितेश राणे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here