25 C
Panjim
Tuesday, January 31, 2023

देवा अशा मूर्खांपासून माझ्या कोकणाला आता वाचव, आमदार नितेश राणे यांचा खासदार विनायक राऊत यांच्यावर ट्विटरवरून निशाणा सोशल मीडियातुन साधला निशाणा

- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – रत्नागिरी-सिंधुदुर्गाचे खासदार विनायक राऊत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे खासदार विनायक राऊत ट्रोल झाले आहेत. या व्हिडीओ वरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी विनायक राऊतांवर हल्ला चढवला आहे. नितेश राणे यांचा खासदार विनायक राऊत यांच्यावर ट्विटरवरून निशाणा साधत देवा अशा मूर्खांपासून माझ्या कोकणाला आता वाचव असे म्हटले आहे.

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे दोन दिवस कोकणच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांनी मास्क परिधान केला होता. मात्र अचानक खासदार राऊत यांना शिंका आली आणि त्यांनी चेहऱ्यावरचा मास्क बाजूला करून आपला हात नाकावर धरून शिंकले. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून तोंडावर मास्क घालतात. मात्र शिंकताना खासदार राऊत नेमकं हेच विसरले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ते चांगलेच ट्रोल झाले आहेत. आमदार नितेश राणे यांनीदेखील हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार. एकदा त्यांना विचारा त्यांनी मास्क का घातला आहे?, अशा मूर्खांपासून माझ्या कोकणाला आता देवानेच वाचवावे”, अशा शब्दांत आमदार नितेश राणेंनी खासदार विनायक राऊत यांचा समाचार घेतला आहे. गेल्या काही दिवसात सिंधुदुर्गात विविध पक्षातील कार्यकर्त्यांच्या या ना त्या पक्षात प्रवेशाचे कार्यक्रम वाढले आहेत. त्यातून विशेषतः भाजपा शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. हे युद्ध आता सोशल मीडियातही सुरु आहे.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles