दारिस्ते येथील स्वप्नाली सुताराच्या मदतीसाठी सोनू सूद सरसावला, स्वप्नालीची मागवली माहिती

0
147

सिंधुदुर्ग – एक ट्विट करा अन् तुमची अडचण सोडवा, असंच काहीस सोनू सुदकडून होणाऱ्या मदत कार्याच्या बाबतीत घडत असल्याचं दिसून येतंय.अभिनेता सोनू सूद आता सिंधुदुर्गच्या स्वप्नालीलाही मदत करण्यासाठी सरसावला आहे. कोरोनामुळे कोकणात अडकलेली स्वप्नाली सध्या दारिस्ते येथील जंगलात झोपडी बांधून ऑनलाईन क्लासला हजेरी लावत आहे. स्वप्नालीची जिद्द आणि तमळळ पाहून सोनुने मदत करण्यासाठी तिचे डिटेल्स मागवले आहेत. स्वप्नालीच्या या जिद्दीची कहाणी डॉ. किरण डेरले यांनी शेअर करुन सोनू सूदकडे मदतीची मागणी केली होती. सोनूने या ट्विटला रिप्लाय देत, स्वप्नालीचे डिटेल्स मागवले आहेत. तसेच, तिच्या गावात Wi-fi पोहोचविण्याचं आश्वासनही सोनूनं दिलंय. सोनूकडून मिळाणाऱ्या मदतीच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, सोनू न थकता, दररोज गरजूंना मदत करताना दिसून येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here