26.6 C
Panjim
Wednesday, June 29, 2022

ठाकरे सरकार हे चायना मेड असलेले डुप्लिकेट सरकार आहे भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांची टीका

spot_img
spot_img
spot_img
spot_img

सिंधुदुर्ग – भाजपाचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी मनाई आदेश झुगारून आज शेकडो भाजपा कार्यकर्त्यांसह सिंधुदुर्ग किल्यावर शिवजयंती साजरी केली. यावेळी त्यांनी राज्यसरकारवार जोरदार टीका केली. ठाकरे सरकार हे चायना मेड असलेले डुप्लिकेट सरकार आहे. असा थेट आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

शिवनेरीवर शिवभक्तांना १४४, मुख्यमंत्री, उपमुख्यामंत्री हेलिकॉप्टरने गेले

शिवनेरीवर सामान्य शिवभक्तांना १४४ लागू केले आणि मुख्यमंत्री, उपमुख्यामंत्री हेलिकॉप्टरने गेले. शिवभक्तांच्या झालेला हा अपमान महाराष्ट्र कधी विसरणार नाही. याठिकाणी शिवरायांच्या पालकीला शिवाजी महाराजांच्या गादिचे वंशज छत्रपती संभाजी राजे याना साधा पालखीला हातही लावायला दिला नाही. हा छत्रपतींच्या गादीचा अपमान आहे. तो आजही अपमान केला. त्यामुळे यांच्या पाठीमागून संभाजी राजे यांनी फरफटत जाऊ नये. उभा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे. असेही निलेश राणे म्हणाले.

सरकारचे शिवाजी महाराजांवरचे प्रेम डुप्लिकेट

शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ल्याना द्यायला पैसे नाहीत हे दुर्दैव आहे. या सरकारचे शिवाजी महाराजांवरचे प्रेम डुप्लिकेट आहे. किती वर्ष झाली शिव स्मारकाला, इतकी वर्ष होऊनही या स्मारकासाठी हे सरकार पैसे देऊ शकलेले नाही. जाहीर केलेले पैसेही द्यायला सरकारला जमत नाही. कोरोनाचे कारण सांगताहेत. शिवरायांबद्दलचे शिवसेनेचे प्रेम हे केवळ दाखविण्यासाठी आहे, लोकांना मूर्ख बनविण्यासाठी आहे, हा त्यांचा निवडणुकीचा अजेंडा आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला केव्हाच लक्षात आले आहे असेही निलेश राणे यावेळी म्हणाले.

शिवरायांच्या गादीचा अपमान होऊ देणार नाही

शिवनेरीवर शिवाजी महाराजांच्या गादीचा अपमान झालेला आहे. शिवरायांच्या गादीचे वारस असलेल्या छत्रपती संभाजी राजे यांनी हे सहन करू नये. त्यांनी फक्त हाक द्यावी त्यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा राहील. असेही निलेश राणे यावेळी म्हणाले.

निलेश राणेंचे शक्तिप्रदर्शन, पोलिसांनी रोखली रॅली

मालवनमध्ये देऊळवाडा ते मालवण किल्ला जेठी पर्यंत मोटारसायकल रॅली काढत निलेश राणे यांनी यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मालवण एसटी बसस्टँड पूर्वी पोलिसांनी निलेश राणे यांची रॅली रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर चर्चेतून ही रॅली शांततेत पुन्हा सुरू झाली.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
- Advertisement -spot_img
spot_img
spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

More Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img