सिंधुदुर्ग – अनलॉकच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात लॉक डाऊन काळात ‘लॉक’ असलेल्या राज्यातील अनेक बाबी सरकारने काही नियम अटीसह ‘अनलॉक’ केल्या. यात सेवा क्षेत्रातील अनेक उद्योगासोबत दारूची दुकाने सुद्धा खुली करण्यात आलेली आहेत. परंतु जनतेची मागणी असूनही गेले साडेपाच महिने भाविकांसाठी बंद असलेली राज्यातील मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात यावीत,यासाठी घंटानादाने ठाकरे सरकारला जाग आणणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली दिली. महाराष्ट्र वगळता देशभरात मंदिरे दर्शनासाठी उघडण्यात आली. परंतु हिंदुत्वद्वेषी आघाडी सरकार जाणीवपूर्वक जनतेच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. या तिघाडी सरकारकडून संधी मिळेल तेव्हा हिंदुत्व विषयाची गळचेपी करण्याचे हिरवे कारनामे सुरू आहेत.
Home National News ठाकरे सरकारला जाग आणण्यासाठी सिंधुदुर्ग भाजप करणार घंटानाद आंदोलन,जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची...