26 C
Panjim
Friday, January 22, 2021

ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची केली थट्टा, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची टीका

Must read

फलोत्पादन योजनेतून रोजगार निर्माण करण्याची जबाबदारी आता स्थानिकांचीच शरद पवार यांचा सल्ला; जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी महाविकास आघाडीचे नेहमीच सहकार्य…

  सिंधुदुर्ग - सिंधुदूर्गात राबविण्यात आलेली फलोत्पादन योजना आपल्या संकल्पनेतून तयार झाली आहे.त्यासाठी आवश्यक निधी दिला,मात्र त्यात सातत्य राहण्यासाठी स्थानिक लोकांनी आणि लोकप्रतिनीधींनी प्रयत्न करावेत,असे...

वाळू माफियांकडून मनसे पदाधिकाऱ्यांवर अंगावर ट्रक घालण्याचा प्रकार

सिंधुदुर्ग - कणकवली तालुक्यातील मुजोर वाळूमाफिया अवैध वाळूवाहतुकीला विरोध करणाऱ्यांच्या अंगावरच ट्रक घालू लागले आहेत. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला थांबवण्याचा इशारा केला असता...

Reliance digital unveils digital India sale with bigger, better offers

This Republic Day, Reliance Digital is back with the exciting ‘Digital India Sale’. The Digital India Sale offers exclusive deals and amazing offers on...

Vijai Sardesai condenms government’s amendments to Lokayukta

Panaji : Goa Forward Party supremo and Fatorda MLA  Vijai Sardesai slammed Goa government for weakening Lokayukta. "Goa Forward Party had moved an amendment...
- Advertisement -

सिंधुदुर्ग – ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. सरकारने शेती नुकसानीसाठी जाहीर केलेले पॅकेज अत्यंत तुटपुंजे आहे. कोकणातील शेतकरी अवकाळी पावसाच्या संकटात पुरता उध्वस्त झाला आहे. त्यामुळे कोकणसाठी स्वतंत्र पॅकेजची सरकारने घोषणा करावी. अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या दरेकर यांनी अवकाळी व परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भात शेतीच्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत पंचनामे झाले काय याबाबत विचारपूस केली. यावेळी आमदार नितेश राणे, प्रसाद लाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत, जिल्हा परिषद सदस्या सायली सावंत, कणकवली तहसीलदार रमेश पवार, कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले आम्हाला वाटलं होत कि सरकार भरीव मदत करेल.मात्र सरकारने १० हजार रुपयांची जी मदत केलेली आहे ती अत्यंत तुटपुंजी आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रात ५ एकर च्या वर शेती बागायती आहेत. तिथले शेतकरी बऱ्यापैकी साधन आहेत. आपल्याकडे कोकणात जास्तीतजास्त ४० गुंठ्यांपर्यंत शेती आहे. १० हजार हेक्टरी पकडले तर येथील शेतकऱ्याला गुंठ्याला १०० रुपये येणार. म्हणजे १० गुंठे शेती असेल त्याला १ हजार रुपये मळणार. हि शेतकऱ्याची थट्टा आहे. कारण त्याला काढणीचा खर्चच त्याला तेवढा येणार आहे. १० हजार कोटीमधले ५ हजार ५०० कोटी फक्त शेतीसाठी आहेत बाकी ३०० कोटी नगरविकासला आहेत, उर्जाल २३९ कोटी आहेत. रस्ते, पुलांसाठी २६०० कोटी रुपये आहेत. अशाप्रकारे हिशेब घातला तर गुंठ्याला फक्त ५ हजार ५०० कोटीतून ५५ रुपये येताहेत. त्यामुळे तुम्ही असे पाचशे हजार रुपये देऊन कशाला शेतकऱ्याची थट्टा करता ? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. तसेच निकष शिथिल करून, स्वतंत्र तरतूद करून कोकणाला शेती नुकसानीसाठी वेगळं पॅकेज द्यावं असही ते म्हणाले.

या सरकारचा नियोजनाचा आभाव आहे.निसर्ग चक्रीवादळातील ६० टक्के मदत अजूनही लोकांपर्यंत पोचलेली नाही. त्यामुळे अत्यंत बारकाईने नियोजन करून मदत सरकारला जनतेपर्यंत पोचवावी लागेल असेही दरेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest article

फलोत्पादन योजनेतून रोजगार निर्माण करण्याची जबाबदारी आता स्थानिकांचीच शरद पवार यांचा सल्ला; जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी महाविकास आघाडीचे नेहमीच सहकार्य…

  सिंधुदुर्ग - सिंधुदूर्गात राबविण्यात आलेली फलोत्पादन योजना आपल्या संकल्पनेतून तयार झाली आहे.त्यासाठी आवश्यक निधी दिला,मात्र त्यात सातत्य राहण्यासाठी स्थानिक लोकांनी आणि लोकप्रतिनीधींनी प्रयत्न करावेत,असे...

वाळू माफियांकडून मनसे पदाधिकाऱ्यांवर अंगावर ट्रक घालण्याचा प्रकार

सिंधुदुर्ग - कणकवली तालुक्यातील मुजोर वाळूमाफिया अवैध वाळूवाहतुकीला विरोध करणाऱ्यांच्या अंगावरच ट्रक घालू लागले आहेत. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला थांबवण्याचा इशारा केला असता...

Reliance digital unveils digital India sale with bigger, better offers

This Republic Day, Reliance Digital is back with the exciting ‘Digital India Sale’. The Digital India Sale offers exclusive deals and amazing offers on...

Vijai Sardesai condenms government’s amendments to Lokayukta

Panaji : Goa Forward Party supremo and Fatorda MLA  Vijai Sardesai slammed Goa government for weakening Lokayukta. "Goa Forward Party had moved an amendment...

COVID-19: 55 new cases, one death

  Panaji: Goa's coronavirus caseload went up by 55 and reached 52,712 on Wednesday,  a health department official said. The death toll remained at 757 as...