20.3 C
Panjim
Monday, January 24, 2022

गोव्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या 34 युवक-युवतींना सिंधुदुर्गच्या सीमेवर रोखले 

Latest Hub Encounter

 

गोव्याहून सिंधुदुर्गातील आपल्या गावी येणाऱया 34 युवक-युवतींना सिंधुदुर्ग प्रशासनाने प्रवेश नाकारत रोखले. या सर्वांना प्रवेश द्यावा की न द्यावा, यावरुन प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू होत्या. मात्र, शनिवारी सायंकाळपर्यंत 34 ही जण गोवा प्रशासनाच्या देखरेखीखाली होते.

या बाबतची मिळालेली माहिती अशी की, शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांच्याकडे गोव्यातील नोकरदार 34 युवक-युवतींनी आपणाला सिंधुदुर्गांत न्या. गोव्यात गैरसोय होत आहे. या बाबतची माहिती दिली. त्यानंतर शनिवारी 8.30 वा. च्या दरम्यान सदर युवक – युवतींना श्री. धुरी यांच्या मदतीने गोव्यातून दोडामार्ग चेकपोस्टपर्यंत आणण्यात आले. यामध्ये दोडामार्ग, कुडाळ, सावंतवाडी या तालुक्यातील कामगारांचा सामावेश होता.

प्रवेश रोखला… पुन्हा सर्वजण गोव्याकडे

जवळपास सकाळी 8.30 वा. च्या दरम्यान गाडी थांबल्यावर सदर कामगारांस सिंधुदुर्ग जिह्यात नेण्यासाठी आवश्यक परवानगीची अट पोलीस प्रशासनाने ठेवली व सर्वांना रोखले. सकाळी आलेल्या कामगारांच्या नाश्ता, दुपारी जेवणाची सोय शिवशंभू प्रतिष्ठान, बाबुराव धुरी, भगवान गवस व प्रशासनाकडून करण्यात आली. मात्र, ‘लॉकडाऊन’ असताना प्रवेश देण्यास मनाईच करण्यात आली. दुपारी जेवणाच्या निमित्ताने गोवा प्रशासनाने आपल्याकडे घेतले असून सायंकाळी उशिरापर्यंत सर्वजण गोवा प्रशासनाच्या देखरेखीखाली होते. धुरी यांनी यावेळी दोडामार्ग तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱयांकडे सदर 34 युवक-युवतींना घरी सोडण्यासाठी निवेदन देत मागणी केली. यावर विचारविनिमय सुरुच होता.

खासदार, आमदारांकडून सहकार्य नाही!

प्रवेश रोखल्यावर तालुकाप्रमुख धुरी यांनी सदर बाब खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिली. दोघांनीही आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करतो व सदर कामगारांस घरी नेण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. प्रवेश रोखल्याचे वृत्त शिवसेनेचे ज्येष्ठ नेते वसंत केसरकर यांना समजताच त्यांनीही खासदार, आमदार व जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -