31 C
Panjim
Monday, December 5, 2022

गोवा इथून उत्तरप्रदेशला जाणारे सातजन ओरोसला ताब्यात

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

लॉकडाऊन’मध्ये अडकलेले अनेक नागरिक आजही छुप्या पद्धतीने गावी परतत असल्याचे चित्र आहे. गोवा येथून उत्तरप्रदेशकडे निघालेल्या सातजणांना ओरोस उपसरपंचांच्या सतर्कतेमुळे बुधवारी रात्री प्रशासनाकडून ताब्यात घेत क्वारंटाईन करण्यात आले.

ओरोस उपसरपंच मनस्वी परब यांचे ओरोस फाटा येथे कापड दुकान आहे. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास त्या दुकानाकडे जात असताना काही लोक महामार्गावरून चालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. ते कुठेतरी जात असतील असा विचार करून त्या पुढे गेल्या. मात्र, रात्री घरी परतताना तेच लोक पुन्हा त्यांच्या दृष्टीस पडले. ते ओरोस येथे नवखे असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी त्यांना हटकले असता ते गोव्यातून चालत आले असून उत्तरप्रदेशकडे जात असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांशी संपर्क साधून त्यांनी याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी त्यांना आरोग्य यंत्रणेच्या ताब्यात दिले. त्यांना नक्की कोठे ठेवण्यात आले, याची माहिती आपल्याकडे नाही. मात्र, अशा लोकांपासून कोरोना फैलावण्याचा धोका असल्याने जिल्हावासीयांनी सावध राहावे. अशा व्यक्ती निदर्शनास आल्यास प्रशासनाला कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, सिंधुदुर्गातून उत्तरप्रदेश येथे रेल्वे सोडल्यास त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सहकार्य देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles