कोकणातील कोरोना तपासणी केंद्र संदर्भात अहवाल सादर करा उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आदेश

0
61

 

कोरोना तपासणी केंद्रा संदर्भात सद्यस्थितीचा अहवाल मंगळवार पर्यंत सादर करण्याचे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आदेश दिले आहेत. कोरोना विषाणूच्या संदर्भात तपासणीसाठी कोकणातील वैद्यकीय यंत्रणेला मिरज येथील सरकारी तपासणी केंद्रावर अवलंबून राहावे लागत आहे. अतिकामाच्या व्यापामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने पाठवलेले सर्व नमुने वेळेत तपासणी करून देण्यात मिरज सरकारी हॉस्पिटल असमर्थ असल्याचे यापूर्वी सांगितले आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांनी जाहीर केलेल्या यादीतील डेरवण येथील वैद्यकीय विद्यालयातील तपासणी केंद्र त्वरित चालू करण्यासाठी रत्नागिरीतील खलील वस्ता यांचे वतीने अॅडव्होकेट राकेश भाटकर यांनी याचिका दाखल केली होती. 22 मे 2020 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तसेच न्यायमूर्ती शिंदे यांच्या खंडपीठासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ने जनहित याचिकेची सुनावणी झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here