धक्कादायक – रत्नागिरी जिल्ह्यात गरोदर महिलेला कोरोना

0
104

 

गुहागर तालुक्यात वेळंब पांगारी पाठोपाठ सडे जांभारी येथील 25 वर्षीय गरोदर महिलेला कोरोना झाल्याचा अहवाल आला आहे. तिचे जिल्हा सिव्हील रुग्णालयामध्ये सिझरींग झाले असून बाळ सुखरूप आहे. परंतु कोरोनामुळे लहान बाळा बरोबर घरातील आणखी नऊ जणांचे स्वॅब घेऊन तपासणी करावी लागणार आहे. सदर महिला 17 मे रोजी मुंबईतून आली होती.

गुहागर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे शुक्रवारी वेळंब पांगारी येथील कोरोना बाधित रुग्ण व त्याच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्याचे काम तालुक्यातील आरोग्य यंत्रणा करत होती. याच दरम्यान सायंकाळी तालुक्यातीलच परंतु जिल्हा सिव्हिल रुग्णालयामध्ये प्रसूती करीता दाखल झालेली महिलेला कोरोना झाल्याचे उघड झाल्याने आता ग्रामीण भागातही कोरोना प्रादुर्भावाचा शिरकाव झाल्याचे समोर येत आहे कोरोना बाधित निघणारे सर्वजण हे मुंबईतील असून त्यांचे स्वतंत्र विलगीकरण व होम क्वारंटाईन केले जात असल्याने सध्यातरी ग्रामीण भाग सुरक्षित आहे असे म्हणावे लागेल सदर महिला 17 मे रोजी गुहागर तालुक्यात आली होती तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला खाजगी वाहनाने 18 मे रोजी जिल्हा सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. सिजरिंग करण्याअगोदर सर्व तपासण्या कराव्या लागतात त्याप्रमाणे कोरोना तपासणीकरिता स्लॅब घेण्यात आले होते. 19 मे ला सिजरिंग झाल्यावर 22 मे रोजी उशिराने कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. तिच्याबरोबर सासू सासरे नवरा व ती स्वतः रत्नागिरीत असल्याने त्या ठिकाणीच तिघांचे स्वॅब घेतले जाणार आहेत.

तर गावी अजून सहा सदस्य आहेत त्यांचेही स्वॅब घेऊन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मुंबईतून आल्यापासून कुटुंबातले दहा व्यक्ती घरांमध्येच क्वारंटाईन होते. त्यांचा गावामध्ये अथवा वाडीमध्ये कोणताही संपर्क आलेला नाही तरीही 25 घरांची असलेली या वाडीला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here