कणकवलीत नितेश राणे १६९४९ मतांनी आघाडीवर 

0
211

 

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असून अनेक दिग्गज लढतींकडे लक्ष आहे. यामधील एक महत्त्वाची लढत म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभेतील नितेश राणे यांची आहे. नितेश राणे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत नितेश राणे यांनी १६९४९ मतांनी आघाडी घेतली आहे.

शिवसेना-भाजपाच्या महायुतीत वादग्रस्त ठरलेल्या जागेपैकी एक म्हणजे कणकवली मतदरासंघ आहे. भाजपाने नितेश राणे यांना उमेदवारी दिली असली तरी शिवसेनेकडून आपला उमेदवार देण्यात आला आहे. नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे ही निवडणूक शिवसेना विरुद्द भाजपा अशी आहे. कणकवलीत काँग्रेसकडून सुशील राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेकडून राजन दाभोळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नितेश राणे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा पार पडली होती. यावेळी नितेश राणे यांनी अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. कणकवली या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारसभेसाठी दाखल होताच नारायण राणे यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. कणकवलीतून नितेश राणे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. आज त्यांचा भाजपात प्रवेश झाला. या दिवसाची मी फार दिवस वाट पाहात होतो असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. माझ्यासह निलेश राणे, नितेश राणे यांचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश झाला असे मी जाहीर करतो असंही नारायण राणे यांनी स्पष्ट केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here