एकता युवा संघाच्या अध्यक्षपदी दिपक वेळीप यांची निवड सरचिटणीस उमेश वेळीप, खजिनदार पदी संतोष गावकर यांची निवड

0
112

 

पणजी – एकता युवा संघ केपें या संस्थेच्या अध्यक्षपदी दीपक वेळीप तर सरचिटणीस म्हणून उमेश वेळीप आणि खजिनदार म्हणून संतोष गावकर यांची निवड झाली आहे.
हल्लीच पार पडलेल्या एकता युवा संघाच्या सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारणी समितीची एकमताने निवड करण्यात आली.

एकता युवा संघाच्या उपाध्यक्षपदी श्रीकांत वेळीप, संयुक्त सचिवपदी श्रीकांत गावकर, संयुक्त खजिनदार म्हणून सूर्यकांत वेळीप, क्रीडा सचिव म्हणून प्रभाकर वेळीप, सांस्कृतिक सचिवपदी प्रशांत वेळीप तर सदस्य म्हणून प्रमोद वेळीप आणि निमंत्रक म्हणून प्रकाश वेळीप यांची निवड करण्यात आली आहे.

या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत गत वर्षी राबवणाऱ्या उपक्रमा संबंधी चर्चा झाली. त्यात वार्षिक एकता उत्सव, क्रिकेट स्पर्धा, वन महोत्सव व अन्य कार्यक्रम आयोजित करण्या संबंधी निर्णय घेण्यात आले. या वेळी वार्षिक अहवाल, वित्तीय टाळेबंदी व २००२-२३ वर्षाच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here