28.8 C
Panjim
Tuesday, May 17, 2022

आमदार नितेश राणे यांची शिवसैनिकावरील हल्ल्या प्रकरणी चौकशी कणकवली पोलिसांनी केली पाऊण तास चौकशी

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

सिंधुदुर्ग – शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणेंची अखेर चौकशी करण्यात आली आहे.या हल्लाप्रकरणी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी कणकवली पोलिसांनी आमदार राणे यांना नोटीस काढली होती. चौकशीसाठी आमदार नितेश राणे गोट्या सावंत यांच्यासह कणकवली पोलीस ठाण्यात आज हजर झाले होते.

 

कणकवली पोलिसांनी केली पाऊण तास चौकशी

 

तब्बल पाऊण तास हीचौकशी झाली. पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या दालनात ही चौकशी झाली.अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, डिवायएसपी डॉ. नितीन कटेकर उपस्थित होते. पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे नितेश राणे यावेळी म्हणाले. जी माहिती पोलिसांना हवी होती ती दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

काय झालं होतं त्यावेळी

 

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक इलेक्शन सुरू असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संतोष परब हे मोटरसायकल वरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या मोटरसायकलला डॉ. नागवेकर यांच्या एम. आर. आय. सेंटर नजीक मागून धडक दिली. धडकेनंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी परब यांच्यावर चाकू सदृश्य टोकदार हत्याराने छातीवर वार केले. या हल्ल्यात परब जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

पोलिसांना सहकार्य करणार – आमदार राणे

 

दरम्यान या प्रकरणी परब यांनी कणकवली पोलिसात दिलेल्या जबाणीत आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांच्यावर संशय व्यक्त केला होता. यामुळे कणकवली पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर रहा अशी नोटीस बजावली होती. या चौकशीला आमदार राणे आज हजर राहीले. या प्रकरणी पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे नितेश राणे यावेळी म्हणाले. जी माहिती पोलिसांना हवी होती ती दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img