31 C
Panjim
Saturday, April 1, 2023

आचरा समुद्रात बोट बुडाली, तीन तासांच्या अथक प्रयत्नानेबाहेर काढण्यात यश

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – मालवण तालुक्यातल्या आचार समुद्रातील पाण्यातील कचरा मच्छीमारांच्या जिवावर बेतत आहे. बुधवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास आसिफ मुजावर आणि इतर खलाशी मासेमारी साठी समुद्रात जात असताना नस्ताजवळ होडीच्या इंजिन मध्ये कचरा अडकून इंजिन बंद पडले.भर समुद्रात इंजिन बंद पडल्याने लाटांमुळे होडी पलटी होऊन खलाशी पाण्यात फेकले गेले.सुदैवाने किनारपट्टी पासून दिडशे फूटाच्या दरम्यान हि घटना घडल्याने होडीतील सर्व खलाशी सुखरूप पोहत बाहेर आले.नजरेच्या टप्प्यात असलेली होडी स्थानिक मच्छिमारांच्या सहकार्याने बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.

आचरा समुद्रात बुधवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास आसिफ मुजावर,जहिर मुजावर हे तुलसी मामा, संदिप बा, राजकुमार मेन यांच्या सह आपली होडी (पात) घेऊन मासेमारीसाठी जात असताना नस्ताजवळ समुद्रातील प्लॅस्टीक कचरा होडीच्या इंजिन मध्ये अडकून इंजिन बंद पडले.नस्ताजवळील धोकादायक ठिकाणी होडी अडकल्याने समुद्राच्या लाटांच्या मारयाने होडी पलटी होऊन होडी वरील मच्छिमार पाण्यात फेकले गेले.किनारपट्टीपासून काही अंतरावरच हि घटना घडल्याने होडीतील सर्व खलाशी प़ोहत सुखरूप किनारयावर आले.घटनेची खबर समजताच जिल्हा परिषद सदस्य जेराॅन फर्नांडिस, पोलीस हवालदार अक्षय धेंडे, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी ,विठ्ठल धुरी यांसह स्थानिक मच्छिमारांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अडीज तीनतासांच्या अथक प्रयत्नाने स्थानिक मच्छिमारांच्या सहकार्याने आसिफ मुजावर यांना होडी बाहेर काढण्यात यश आले असले तरी इंजिन आणि होडीचे मिळून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आचरा समुद्राचे नस्त धोकादायक

आचरा समुद्रात जिथे खाडी समुद्राला मिळते तो नस्ताचा भाग गाळाने भरून गेल्याने आधीच धोका दायक बनला असताना आता खाडीच्या पाण्यातून येणारा प्लॅस्टीक आणि इतर कचरा यामुळे अधिकच धोकादायक बनला आहे.या कचरयामुळे समुद्रातील जिवजंतूंनाही धोका निर्माण होतो आहे.तसाच मासेमारीसाठी जाणारया मच्छिमारांनाही त्रास दायक बनला आहे. या मुळे समुद्रात येणारा हा कचरा भविष्यात मोठा त्रासदायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या बाबत प्रत्येकाने जागृत होणे आवश्यक बनले आहे.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles