26.4 C
Panjim
Thursday, March 30, 2023

असलदे रामेश्वर विकास सोसायटी चेअरमन पत्रकार भगवान लोके बिनविरोध….. व्हाईस चेअरमनपदी दयानंद हडकर यांची निवड;पक्षविरहित सहकार विकास पॅनेल म्हणून काम करणार..

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

 

सिंधुदुर्ग – श्री. रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. असलदे या संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.त्यानुसार गावातील सर्वच राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत ही निवडणूक बिनविरोध करण्याचा एकमुखी निर्णय घेतला.त्यानुसार १३ जागांसाठी १३ संचालक बिनविरोध झाले होते. असलदे रामेश्वर विकास सोसायटी चेअरमन पत्रकार भगवान लोके तर व्हाईस चेअरमनपदी दयानंद हडकर बिनविरोध सर्वानुमते करण्यात आली.पक्षविरहित सहकार विकास पॅनेल म्हणून हे संचालक मंडळ काम करणार असल्याचा विश्वास नूतन चेअरमन भगवान लोके यांनी दिला.

 

असलदे ग्रामपंचायत येथील रामेश्वर सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी एस.आर.मयेकर यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.यावेळी संचालक दिनकर दळवी, विठ्ठल खरात, उदय परब, शामराव परब, संतोष परब, परशुराम परब , कांचन लोके, सुनिता नरे, शत्रुघ्न डामरे, अनंत सखाराम तांबे, प्रकाश विठू खरात आदी १३ संचालक उपस्थित होते. सर्वानुमते चेअरमन पत्रकार भगवान लोके तर व्हाईस चेअरमनपदी दयानंद हडकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाली.यावेळी नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व माजी चेअरमन प्रकाश परब यांनी ३५ वर्षे संस्थेची यशस्वी जबाबदारी पार पाडल्याबद्दल गावाच्या वतीने शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल सरपंच पंढरी वायंगणकर,लक्ष्मण लोके सर्व संचालक व जेष्ठ नागरिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

यावेळी असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, सोसायटी माजी चेअरमन प्रकाश परब,तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे

माजी सरपंच सुरेश लोके,लक्ष्मण लोके,तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिव रघुनाथ लोके, विजय आचरेकर,विष्णू डगरे ,सचिन लोके,संतोष घाडी, विजय डामरे,पंकज आचरेकर, सचिन लोके,आत्माराम घाडी,चंद्रकांत जेठे,प्रशांत लोके,प्रदीप हरमलकर,संदेश आचरेकर,संजय जेठे, मनोज लोके, दयानंद डगरे,विष्णू डगरे, प्रकाश आचरेकर, अनिल लोके,कोतवाल मिलींद तांबे,रामचंद्र जेठे, गौरव लोके,यश जेठे आदींसह असलदे गावातील ग्रामस्थ व शेतकरी सभासद उपस्थित होते.सर्व उपस्थितांचे आभार सचिव अजय गोसावी यांनी मानले.

 

 

शेतकरी सभासदांच्या हिताच्या योजना राबविणार-भगवान लोके

 

रामेश्वर विकास संस्थेच्या चेअरमनपदी मला बिनविरोध केल्याबद्दल सर्वांची मी ऋणी आहे.गावाने मला,तरुणांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना रोजगार निर्मिती योजनांची अंमलबजावणी केली जाईल.शेतकरी गाव विकास पॅनेल हे राजकीय पक्ष विरहीत आहे.तो गावातील शेतकरी व नागरिकांचा विश्वास सार्थकी लावणार आहे.त्यासाठी लवकरच सभासद नोंदणी, योजनांची माहिती घेऊन वाडीवार भेटी घेणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित चेअरमन,पत्रकार भगवान लोके यांनी व्यक्त केला.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles