अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची प्रकरणे सावंतवाडीत उघड; दाेन युवकांवर गुन्हा दाखल

0
238

सिंधुदुर्ग:अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची दोन प्रकरणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीत उघड झाली आहेत. यातील एक मुलगी ही दोन महीन्याची गर्भवती आहे. या प्रकरणी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात दोघा २३ वर्षीय युवकांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सावंतवाडीचे पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली आहे.

यातील एक प्रकरण सावंतवाडी शहरातील, तर दुसरे प्रकरण वेंगुर्ले तालुक्यातील आहे. यातील वेगुर्लेतील युवकाला काल ताब्यात घेण्यात आले असून त्याला न्यायातात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. तर सावंतवाडी प्रकरणातील युवकाला सायंकाळी उशिरा ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान त्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले.

हे प्रकरण सावंतवाडी शहराला लागून असलेल्या एका भागात घडते आहे. संबधित युवकाने त्या मुलीची फसवणूक करुन घरात कोणी नसल्याची संधी सांधत अत्याचार केला होता. हा प्रकार ती गर्भवती झाल्यामुळे उघड झाला. घरातील व्यक्तींनी तिला तपासणीसाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.. यावेळी तेथिल वैदयकीय अधिकाऱ्यांनी याबाबतची तक्रार पोलिसांना दिली. त्यानुसार उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरा प्रकार हा वेगुर्ले तालुक्यात घडला आहे. संबंधित युवतीला घरातील व्यक्तींनी नाकारल्यानंतर ती महीला अंकुर वसतिगृहात होती. त्याठिकाणी तपासणी दरम्यान हा प्रकार उघड झाला. त्यानंतर अंकुरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार घेण्यात आली असून पुढील तपासासाठी हा गुन्हा वेंगुर्ले पोलिसांकडे वर्ग करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here