मतमोजणीच्या ठिकाणी दोन्ही गटाचे कार्यकर्ते दाखल! अनुचित प्रकार टाळण्यासाठी पौलिसांचा फौजफाट तैनात

0
95

 

 

सिंधुदुर्ग : जिल्हा बँकेच्या निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली असून सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. अत्यंत चुरशीने झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडी च्या पॅनेल मध्ये सत्तेसाठी प्रचारादरम्यान जोरदार रस्सीखेच झाली होती. 19 संचालक पदासाठी 968 मतदारांनी आपले मतदान केले असून थोड्या वेळात पहिला निकाल हाती येणार आहे.

मतमोजणीच्या ठिकाणी दोन्ही बाजूने भाजप व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होत असून त्यांनाही निकालाची उत्कंठता लागली आहे. भाजपकडून जोरदार घोषणाबाजी सुरूवात केली अाहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here