सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मडूरा, सातोसेतील युवक इराणमध्ये अडकले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नातेवाइकांमध्ये घबराट

0
152

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या मडूरे रेखवाडी तसेच गोव्यातील ९ युवक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये अडकले आहेत. हे सर्व युवक नोकरीनिमित्त इराणमध्ये असतात. इराण देशात कोरोना व्हायरसचा प्रभाव असून विमानसेवा बंद आहे. त्यामुळे संबंधित तरुणांसह त्यांच्या नातेवाइकांमध्येही घबराट पसरली आहे. आपण इराणमध्ये अडकलो असून याची माहिती कणकवलीचे आमदार नितेश राणे यांना द्यावी. तेच आम्हांला या संकटातून बाहेर काढू शकतात असा मेसेज त्यांनी नातेवाइकांना पाठविला आहे.

मडूरे व सातोसे रेखवाडी येथील सागर पंडीत, विकास सुतार, उदय पाटकर, विनोद परब, अजय परब, रोहन पेडणेकर, मितेश राऊळ, नितीन गावडे, सचिन कळंगुटकर हे युवक नोकरीसाठी इराणमध्ये आहेत. इराण देशात कोरोना व्हायरसचा प्रचंड प्रभाव आहे. या पार्श्वभूमीवर इराणमधून विमानसेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित युवकांच्या घरच्या मंडळींसह नातेवाइकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here