बैलगाडी शर्यती व बैलांची झुंज कार्यक्रमाला परवानगी मिळावी आमदार नितेश राणे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे मागणी

0
62

सिंधुदुर्ग – कोविड १९ या महामारीच्या कालावधीमध्ये शासनाने सर्व प्रकारच्या सार्वजनिक व करमणूकीच्या कार्यक्रमांवर बंधने आणलेली होती.

त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गेले दीड वर्षे सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम बंद आहेत . आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंधने दूर करण्यात येत आहेत.

बैलगाड्या शैर्यती व बैलांची झुंज ग्रामीण भागातील लोकप्रिय व पारंपारिक कार्यक्रम पूर्वीपासून साजरे करण्यात येत आहेत.त्यांना तातडीने परवानगी द्यावी,अशी मागणी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे आ.नितेश राणे यांनी मागणी केली आहे.

तसेच या कार्यक्रमांना बैलांना कोणत्याही प्रकारची इजा व दुखापत होणार नाही याची योग्य ती काळजी घेतली जाईल, असा विश्वास मी तुम्हाला देतो.

तरी या कार्यक्रमांना नियम व अटींच्या शैर्यतीस अधीन राहून सुरू करण्यास परवानगी द्यावी ,असे आ.नितेश राणे यांनी पत्रात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here