ठाकरे – राणे वादाचे सिंधुदुर्गात पडसाद, राणेंवर बोलणाऱ्या शिवसेना नेते संदेश पारकर यांचा घेतला भाजपा नेते समीर नलावडे यांनी समाचार आरोप प्रत्यारोपांनी सिंधदुर्गचे राजकीय वातावरण तापले

0
142

सिंधुदुर्ग – उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात नारायण राणेंवर टीका केली आणि सिंधुदुर्गात राजकीय वातावरण तापले असून आरोप प्रत्यारोपांचे मोठे युद्ध सुरु झाले आहे. स्थानिक पातळीवर या वादाने मोठे स्वरूप धारण केले आहे. शिवसेना नेते संदेश पारकर यांनी या वादात पडताच आता भाजपा नेते तथा कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पारकर यांना सुनावले आहे. राणेंमुळे आपण कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष झालात हे लक्षात ठेवा. राणेंची साथ सोडला आणि पराभूत झालात. गद्दारी चे दुसरे नाव म्हणजे संदेश पारकर अशा शब्दात टीका केली आहे.

पारकर आता ज्या पक्षात आहेत तेथे पारकर यांना साधे पक्षाचे घटनात्मक पदही दिलेली नाही. त्यावरून पारकर यांनी आपली कुवत ओळखावी. संदेश पारकर हे सत्ताधारी पक्षात असून सुद्धा गेले सहा महिने त्यांना अंगरक्षकासाठी झगडावे लागत आहे. खरं तर त्यांना अंगरक्षकांची गरज काय हा प्रश्न न उलगडणारा आहे ? अंगरक्षक घेऊन शायनिंगबाजी करण्यापुरतीच पारकर यांची मर्यादा आहे. सत्ता असून देखील शासकीय अंगरक्षक मिळत नाही हि पारकर यांची राजकारणातील उतरती कळा आता त्यानी ओळखावी. नारायण राणेंवर टीका करून स्वतःचे अस्तित्व दाखवणाऱ्या पारकर यांनी राजकारणातील आपले निवृत्तीचे वय झाले हे ध्यानात घ्यावे. असेही नलावडे म्हणाले.

सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादी त्यानंतर पुन्हा काँग्रेस, नंतर भाजपा व आता शिवसेना एवढे पक्ष बदलूनही पारकर यांना फक्त नारायण राणे यांनीच पद दिले. राणेंनी साथ सोडल्यानंतर पारकरांच्या नशिबी पराभवच आला. त्यामुळे आपली कुवत ओळखून पारकर यांनी आपली जीभ चालवावी. नारायण राणेंवर टीका करून प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या पारकर यांना कणकवलीकरांनी नाकारले. अशा कणकवलीतही अस्तित्वं नसणाऱ्या पारकर यांनी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांवर टीका करणे म्हणजे स्वतःची लाल करण्यातला प्रकार आहेत. नारायण राणेंकडून पद घेऊन कृतघ्न झालेल्या पारकर यांनी पदाच्या लालसेपोटी नारायण राणे यांची साथ सोडली. पण त्यांची मर्यादा कणकवली पुरतीही राहिली नसल्याची जाणीव कणकवलीकराणी निवडणुकीत करून दिली. पारकर जास्त काळ कुठल्याच पक्षात राहत नाहीत.त्यामुळे शिवसेनेत ते किती काळ राहतील याचा कुणालाच भरोसा नाही. असेही यावेळी नलावडे म्हणाले.

नारायण राणेंवर बोलूनच पारकर यांनी आपली प्रतिमा बनवली. आताही ते तेच करत आहेत. यातून काही सध्या करता येणार नाही. त्यामुळे पारकर यांनी आपली उरलीसुरली असलेली अब्रू वाचवण्यासाठी राजकीय संन्यास घेण्याची वेळ आता आली आहे. अन्यथा तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी त्यांची परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही. असा सल्ला समीर नलावडे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here