अखंड श्रमिक मुक्तीवेध तर्फे सोमवार 16 ऑगस्ट रोजी “निर्धार मेळाव्याचे” आयोजन जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने कार्यक्रमाचे आयोजन

0
48

सिंधुदुर्ग – अखंड श्रमिक मुक्तीवेध आयोजित जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून सोमवार 16 ऑगस्ट रोजी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पिसेकामते येथील शैला कदम यांच्या निवसासमोरील प्रांगणात हा कार्यक्रम सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत पार पडणार आहे. अशी माहिती अखंड लोकमंच संस्थेचे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी दिली आहे.

या कार्यक्रमात व्यसनमुक्त समाज, हक्काचं घर, शिक्षण, संविधानिक मानवी अधिकार, सामाजिक समता या पंचसूत्रीचा निर्धार केला जाणार आहे. कातकरी विद्यार्थी आणि व्यसनमुक्त झालेल्या कातकरी बांधवांचा सत्कार केला जाणार आहे. यावेळी निर्धार शपथ घेतानाच कातकरी बांधवांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात कातकरी बांधवांची गीते सादर केली जाणार आहेत. मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी अंधश्रद्धा जागृतीही केली जाणार आहे.

या कार्यक्रमाला सर्वांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन अखंड लोकमंच संस्थेचे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here