सिंधुदुर्ग – पालघर ते सिंधुदुर्ग अशी सात दिवस चालणारी सर्वात मोठी जन आशीर्वाद यात्रा केंद्रीय लघु, सूक्षम व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची निघणार आहे.
ही यात्रा १९ ऑगस्ट ला मुंबई पासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या संकल्पनेतून आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा मार्गदर्शनाखाली या जन आशीर्वाद यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.
मुंबई व्हाया वसई विरार करून रायगड, रत्नागिरी, अशी सिंधुदुर्ग जिल्हात २५ ऑगस्ट रोजी येईल ही यात्रा ११ जिल्ह्यातून , ९ लोकसभा मतदारसंघात, ३३ विधानसभा संघातून जाणार आहे.
३०० पेक्षा जास्त सभा होणार आहेत.पूरग्रस्थानसाठी दिलासा देणारी नुकसानग्रस्थानचे अश्रू पुसणारी ही जन आशीर्वाद यात्रा असेल.
अशी माहिती या यात्रेचे संयोजक भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिली. ते कणकवली येथे माध्यमांशी बोलत होते.
केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे हे १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दाखल होतील.
२० ऑगस्ट रोजी मुंबई उपनगरात ही जन आशीर्वाद यात्रा दाखल होईल. त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी वसई-विरार येथे ही जन आशीर्वाद यात्रा दाखल होणार आहे.
२३ ऑगस्ट रोजी दक्षिण रायगड जिल्ह्यातील पाली येथील श्री गणेश दर्शन करून महाड चवदार तळे येथे डॉ.बाबा साहेबांना अभिवादन करून चिपळूण पुरग्रस्थ भागातील प्रश्न जाणून घेऊन यात्रा पुढे रवाना होईल.
२४व २५ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत 25 ला सायंकाळी 4 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार असे श्री.जठार यांनी सांगितले.