स्वरमंच-मडगांव तर्फे आरती व भजन प्रशिक्षण कार्यशाळेस प्रारंभ

0
252

गोव्यातील पन्नास वर्षाहून अधिक काळ संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या “स्वरमंच ” मडगाव ह्या संस्थेतर्फे गणेश चतुर्थीचे औचित्य साधून सर्व वयोगटांचा सहभाग असलेल्या आरती आणि अभंग गायन प्रशिक्षण कर्यशाळेस शनिवार दि.४ अॉगष्ट पासुन सुरवात झाली.
गोव्यातील प्रसिद्ध तबलापटू व संगीतकार श्री यतीन तळावलीकर ह्यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरवात झाली, ह्या वेळी संस्थेचे पदाधिकारी सुहास सडेकर, हर्षद कुंदे ,किरण नायक तसेच गीतकार नंदन हेगडे देसाई उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात यतीन तळावलीकर यांनी अशा प्रकारच्या कार्यशांळांचे आयोजन केल्या बध्दल स्वरमंचचे अध्यक्ष श्री सिद्घनाथ बुयांव व समितीचे अभिनंदन केले, आरत्या गाताना शब्दांची स्पष्ठता व सुरेलता असणे ह्यावर विचार मांडले. ह्या कार्यशाळेत गजर, आरत्या आणि निवडक अभंग शिकवण्यावर भर दिला जाईल असे अयोजन समितीतर्फे सांगण्यात आले. पहिल्याच दिवशी २६ पेक्षा जास्त इछ्चूकांनी सहभाग घेतला. ह्या संपूर्ण कार्यशाळेला गोव्यातील सुप्रसिद्ध संवादीनी वादक श्री धनराज मडकईकर यांचे मार्गदर्शन लाभेल. कार्यशाळा प्रत्येक गुरूवारी आणि शनिवारी संध्याकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत स्वरमंच संस्थेच्या वास्तूत चालू असतील अशी माहिती आयोजकांतर्फे कळविण्यात आले.
लवकरच सुगम संगीताची कार्यशाळा पण सुरू करण्यात येईल अस अध्यक्ष सिध्दनाथ बुयांव यानी कळविले आहे।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here