सिंधूकन्या स्वानंदी सावंतने राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक!

0
242

 

सिंधुदुर्ग : सिंधूकन्या असलेल्या मूळ गाव तरेळे आणि मसुरे गडघेरावाडी येथे आजोळ असलेल्या स्वानंदी संतोष सावंत हिने तामिळनाडू कोइंबतूर येथील नेहरू स्टेडियम मध्ये झालेल्या व तामिळनाडू ॲथलेटिक असोसिएशन च्या वतीने पार पडलेल्या ३८ व्या ज्युनिअर राष्ट्रीय शालेय ॲथलेटिक्स या स्पर्धेमध्ये मध्ये १६ वर्षाखाली मुली गटातून ८० मीटर हरडल्स स्पर्धा ११.७३ सेकंदात पार करून प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्णपदक पटकाविले. स्वानंदी सावंत ही या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत होती.स्वानंदी सावंत ही उदयाचल हायस्कूल गोदरेज विक्रोळी ईस्ट या प्रशालेमध्ये इयत्ता नववी मध्ये शिकत असून तिला प्रशिक्षक महणून वीरेंद्र यादव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

याच स्पर्धेमध्ये तामिळनाडूच्या लतिका धरणे ११.७५ सेकंद रौप्य पदक, तर महाराष्ट्राच्या स्वराली कुंडलेणे ने १२.४२ सेकंद ब्रांझ पदक मिळवले. याच स्पर्धेमध्ये १८ वर्षाखालील मुलींच्या गटाच्या शंभर मीटर अडथळा शर्यतीत महाराष्ट्राच्या अलीझा मुल्लाला १४.३९ सेकंद रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्याच श्रावणी सांगलेने १४.५८ से. ब्रांझ पदक पटकावले. अठरा वर्षाखालील मुलांच्या गटाच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत संदीप दौड ने १३.७९ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळविले. महाराष्ट्राच्या सैफ चाकेकर १३.९४ से सेकंद रौप्य पदक मिळविले. वीस वर्षाखालील मुलांच्या गटाच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत महाराष्ट्राच्या दक्ष सुमेरपुरने १४.२३ सेकंद वेळ नोंदवून रौप्य पदक नयन सरदेने १४.३० सेकंद ब्रांझ पदक पटकावले.

स्वानंदी हिला यापूर्वी हर्डल्स स्पर्धेमध्ये जिल्हा, राज्य आणि नॅशनल स्पर्धांमध्ये ब्राँझ, सिल्वर, गोल्ड मेडल प्राप्त झालेली आहेत. मुंबईमध्ये झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये तिने प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. गतवर्षी गुवाहाटी येथे झालेल्या नॅशनल स्पर्धेमध्ये तिने ब्राँझ मेडल पटकाविले होते. यावेळी बोलताना स्वानंदी सावंत म्हणाली भविष्यामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा आपला मानस आहे. यासाठी आपण कठोर मेहनत, कठोर परिश्रम घेत आहे. मिळालेल्या अशा अनेक संधींचा उपयोग करून या भूमीचे, आपल्या गावाचे, आई-वडिलांचे, मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचे आणि संपूर्ण परिवाराचे नाव रोशन करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. स्वानंदी हिच्या या यशाबद्दल मसुरे, तरळे गावातून तसेच मुंबई येथे ती शिकत असलेल्या स्कूल मधील शिक्षकांनी आणि पालकांनी, परिवाराने तिचे विशेष अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here