सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यावर्षीपासून १०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार, आमदार वैभव नाईक यांची माहिती

0
125

 

सिंधुदुर्ग – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र शासनाच्या एन.एम.सी. (नॅशनल मेडिकल कामिशन) ने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांपासून पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी. बी.एस.च्या १०० जागा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. याबाबतच्या परवानगीचे पत्र देण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एन.एम.सी. ने तत्वतः मान्यता दिली होती. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने एन.एम.सी. च्या सूचनांबाबत पुढील कार्यवाही पूर्ण केल्यानंतर यावर्षीपासून १०० विद्यार्थ्यांना एम.बी. बी.एस. अभ्यासक्रम सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, खा.विनायक राऊत, ना.उदय सामंत, आ.दीपक केसरकर व आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. अशी माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here