सिंधुदुर्ग जिल्ह्यात 43 डेंग्यू सदृश रुग्ण;आरोग्य विभागाची चिंता वाढली… कणकवली, कसाल,पडवे,बांदा साथीचा उद्रेक…

0
220

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातील शिरवल गाव साथ ग्रस्त गाव म्हणून घोषित करण्यात आले असून त्या गावात मोठ्या प्रमाणात डेंग्यू सदृश्य रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत एकाच मृत्यू झाला आहे.तर अन्य एका मृत्यूचे कारण स्पष्ट होणे बाकी आहे. नागरिकांनी दक्ष राहावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

वैभववाडी तालुका वगळता अन्य सात तालुक्यात डेंग्यूचे एकूण ४३ रुग्ण आढळून आले आहेत.
कसाल ,पडवे, बांदा येथे साथीचा उद्रेक झाला आहे.त्यात एकाचा गोवा बांबुळी येथे मृत्यू झाला. तर सद्यस्थितीत कणकवली शिरवळ तापाचे अहवाल आढळलेले आहेत.चार रुग्ण डेंग्यू पॉझीटीव्ह आले आहेत.

९ ऑगस्ट पर्यंत साथीचा उद्रेक होईल असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे,त्याचप्रमाणे पुन्हा नव्याने रुग्ण आढळल्यास रुग्ण आढल्याच्या दिनांक पासून पुढे १४ दिवस उद्रेक कायम राहील असेही स्पष्ट करण्यात आले.

साचलेल्या पाण्यात डेंग्यू आजाराचे अळ्या निर्माण होतात. आरोग्याची काळजी घ्यावी तर एकाचा तापाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे घरात तसेच परिसरात हे सर्व रुग्ण जिल्हा बाहेरून मधून आढळून आलेले आहेत. कोणताही ताप अंगावर काढू नये.पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या.अस आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here