सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाने ११ दिवसांत घेतले २७ बळी

0
152

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात कोरोना विषाणूचे संक्रमण जोरदार वाढू लागले आहे. गेल्या अकरा दिवसांत तब्बल २७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत एकूण ५४ बळी गेले आहेत. जिल्हा प्रशासनाने चाचण्यांचा वेगही वाढविला आहे. मात्र, चाचण्यांबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.

कोरोना चाचणी केली तर पॉझिटिव्ह निघेल या भीतीपोटी अनेक जण चाचणी करण्यास धजावत नसल्याचे दिसते. मात्र, जिल्ह्यातील चाचण्यांच्या व त्यांच्या अहवालावर लक्ष टाकले तर कोरोना चाचणी करणाऱ्यांपैकी तब्बल ८३.६२ टक्के नागरिक निगेटिव्ह निघाले आहेत. यावरून चाचणी बाबतची भीती अनाठायी असल्याचे दिसून येते. कोरोना विषाणूचा संसर्ग हा परदेश किव्हा राज्य व इतर जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. मार्च पासून ते अगदी जुलै पर्यंत कोरोना नियंत्रणात होता. प्रशासनाने कोरोनाला मर्यादित ठेवले होते. मात्र, जस जसा इतर जिल्ह्यातील नागरिक आपल्या मूळ गावी परंतु लागले तसे तसे कोरोनाचे रुग्ण वाढू लागले.

सुरुवातीला परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना होणारा कोरोना आता मोठ्या प्रमाणात स्थानिकांना होत आहे. शहरी भागप्रमाणेच ग्रामीण भागातही कोरोनाचे जाळे पसरले आहे. काही नागरिकही बेजबाबदारपणे वागत असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. मास्क न लावणे, सुरक्षित अंतर न ठेवणे, सॅनिटायझरचा वापर न करणे या सूचनांचे पालन होताना दिसून येत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा तसा ग्रामीण भागात येतो. त्यामुळे ग्रामीण भागाच्या तुलनेत जिल्ह्यात वाढत जाणारी कोरोनाची संख्या लक्षणीय आहे. ऑगस्ट महिन्यापासून सुसाट वेगाने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.

मार्च पासून स्वॅब तपासणीला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला मिरज येथील रुग्णालयात व त्यानंतर कोल्हापूर येथील रुग्णालयात स्वॅब तपासले जाऊ लागले. त्यावेळी काही ठराविक अहवाल पाठवले जात होते. त्यानंतर मे मध्ये शासनाची लॅब जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाली. त्यावर हे अहवाल तपासले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग जोरदार वाढू लागला आहे. यात चिंतेची बाब अशी की हा संसर्ग संपर्कातून होत आहे. कोणत्याही प्रवासाची पार्श्वभूमी नसताना कोरोना पॉझिटिव्ह म्हणून पुढे येत आहे. ऑगस्टपासून हा संसर्ग वाढत चालला आहे. कोरोनासोबत जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक बनले आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांचीच जबाबदारी आहे. कोरोनाचा संसर्ग प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना होत आहे.

त्यामुळे सोशल डिस्टनसिंग पळून शासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. सोबतच चाचण्याबाबतची भीती बाजूला सारून लोकांनी सौम्य लक्षणे दिसताच मोकळ्या मनाने चाचणी करून घेणे गरजेचे आहे. याशिवाय आता जिल्हा रुग्णालयाच्यावतीने अँटीजन चाचण्याही सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता चाचण्यांचा वेग वाढला आहे.

कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कसोशीने प्रयत्न केले. परंतु त्यांना म्हणावे तसे यश आले नाहीत. अपुरे मनुष्यबळ किव्हा जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी पॉझिटीव्ह येणे ही कारणे कदाचित असू शकतात. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हा रुग्णालयाने तपासणीचा वेगही वाढविला आहे. दररोज सुमारे ५०० नमुने तपासले जात आहेत. त्यामुळे रूग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.दररोज ५० च्या पुढे रुग्ण वाढत आहेत. दोन दिवसांपूर्वी तर १९० एवढी विक्रमी रुग्ण संख्या मिळाली होती. सर्व नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. काही नागरपंचायतींनी जनता करफ्यूचा निर्णय देखील घेतला आहे. साखळी खंडित करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. काही व्यापारी जनता करफ्यू करायला तयार नाहीत. त्यांचा विरोध आहे. मात्र कणकवली सारख्या अन्य नगरपंचायतींनी उशिरा का होईना जनता करफ्यू सारखा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.

सद्या जिल्ह्यात जस जशे रुग्ण वाढत आहेत तसतशे स्वॅब तपासणीलाही गती मिळाली आहे. आता पर्यंत २१ हजार ५२३ अहवाल तपासले गेले आहेत. त्यात २८८६ पॉझिटीव्ह तर १७ हजार ९९६ निगेटिव्ह आढळले होते. टक्केवारीचा हिशोब केला तर तब्बल ८३.६२ नागरिकांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here