28 C
Panjim
Wednesday, August 17, 2022

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी डाॅ.पी.जी दीक्षित खासदार विनायक राऊत यांनी दिली माहिती

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीसाठी प्रभारी अधिष्ठाता म्हणून डॉ. पी.जी दिक्षीत यांची संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांनी नियुक्ती केली आहे,अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. डॉ.पी.जी.दिक्षीत सध्या विभाग प्रमुख प्राध्यापक न्यायवैद्यकशाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,मिरज याठिकाणी कार्यरत होते. त्यांच्या या नव्या नियुक्तीनंतर त्यांना मूळ पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अधिपत्याखाली सिंघुदुर्ग जिल्ह्यात शासनाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालय निर्माण करण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. सदर आदेशाच्या अनुषंगाने जिल्हा सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुगणालय निर्माण करण्याच्या दृष्टीने शासन/केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन जागा हस्तांतरण आरोग्य सेवे बरोबर करावयाचा सामजस्य करार तसेच भारतीय आयुर्विज्ञान परिषद, राष्ट्रीय वैद्यक परिषद येथे अर्ज दाखल करणे व केंद्र शासनाची मान्यता प्राप्त करणे आदी कामे शिघ्र गतीने होण्याकरिता डॉ.पी.जी.दिक्षीत, विभाग प्रमुख प्राध्यापक न्यायवैद्यकशास, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,मिरज यांना प्रभारी अधिष्ठाता म्हणून नियुक्त केले आहे.

डॉ.पी.जी.दिक्षीत, विभाग प्रमुख प्राध्यापक न्यायवैद्यकशाल,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,मिरज यांना जिल्हा सामान्य रुग्णालय,ओरोस येथे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालया करिता निर्माण करण्यात आलेल्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी २३ ऑक्टोबर पासून कार्यमुक्त करण्यात येत आहे, असे संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांनी नियुक्ती पत्रात म्हटले आहे.डॉ.पी.जी.दिक्षीत यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग करिता प्रभारी अधिष्ठाता म्हणून नियुक्त करण्यात आल्याने केंद्र व राज्य सरकारच्या महाविद्यालयीन योग्य त्या पुर्तता जलद गतीने होतील असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img