सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न मिटला, 13 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले

0
341

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात आतापर्यंत पडलेल्या 1600.825 मिलीमीटर पावसामुळे जिल्ह्यातील 13 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तर देवगड तालुक्‍यातील कोर्ले-सातांडी हा मध्यम प्रकल्प सुद्धा 100 टक्के भरला आहे. जिल्ह्यातील एकमेव असलेल्या तिलारी आंतरराज्य या मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा 69.34 टक्के भरला आहे.

निसर्ग चक्रीवादळमुळे जिल्ह्यात 1 जूनपासूनच पाऊस दाखल झाला. सुरुवातीला वादळी पाऊस पडल्यानंतर जिल्ह्यात मौसमी पाऊस दाखल झाला; मात्र दाखल झाल्यापासुन हा पाऊस अविरत कोसळत आहे. त्यामुळे जून महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील नदी, नाले, ओहोळ तुडूंब भरून वाहू लागले होते. तर पावसाने सातत्य राखल्याने जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या धरणातील पाणी साठा झपाट्याने वाढू लागला होता. जुलै महीना सुरु होवून सात दिवस झाले तरी पाऊस सातत्याने कोसळत असल्याने या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे.

सततच्या पावसामुळे देवगड तालुक्‍यातील कोर्ले – सातांडी मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला असून सध्या या प्रकल्पातून 3 घनमीटर सेकंद विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेल्या तिलारी आंतरराज्या प्रकल्पामध्ये सध्या 310.2090 दशलक्षघनमीटर पाणीसाठा असून सध्या हा प्रकल्प 69.34 टक्के भरला आहे. तर देवघर मध्यम प्रकल्पामध्ये 49.6140 दशलक्षघनमीटर म्हणजेच 50.62 टक्के आणि अरुणा प्रकल्पामध्ये 31.8800 म्हणजेच 45.33 टक्के पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यातील लघु पाटबंधारे असलेले शिवडाव, आडेली, आंबोली, हातेरी, माडखोल, निळेली, सनमटेंब, पावशी, शिरवल, पुळास, हरकुळ, ओझरम, लोरे हे 13 प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. हरकुळ प्रकल्पातून सध्या 14.65 घनमीटर सेकंद इतका विसर्ग सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here