सिंधुदुर्गात सूर्याभोवती पाहायला मिळाले “इंद्रधनुष्याचे प्रभामंडळ”

0
137

सिंधुदुर्ग – काही दिवसांपूर्वी चंद्राभोवती कडे पाहायला मिळाले होते.ही घटना ताजी असतानाच आज सिंधुदुर्गात सूर्याभोवती इंद्रधनुष्य स्वरूपी रिंगण पाहायला मिळाले.

दरम्यान सूर्याभोवती पडलेल्या या खळंला इंग्रजीमध्ये हॅलो असे संबोधतात,तर मराठीत त्याला इंद्रधनुष्याचे प्रभामंडळ म्हणतात.

सूर्या भोवती पडलेल्या या खळंचे शास्त्रीय कारण असे आहे की,वादळ आल्यनंतर आकाशामध्ये जवळ-जवळ २० हजार फूट उंचीवरती सिरस नावाचे ढग तयार होतात.

या ढगांच्या मध्ये लाखों च्या संख्यने लहान लहान बर्फाचे क्रिस्टल्स असतात. या क्रिस्टल्स मधून सूर्याची किरणे गेल्यानंतर त्या किरणांचे रिफ्लेक्शन,रिफ्रॅकशन किंवा स्प्लिंटिंग होते.

यामध्ये बर्फाचे असनारे तुकडे हे प्रिझम सारखे काम करतात.पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा १.३३ एवढा आहे.

पाणी हे द्रव स्वरूपात असते तर बर्फ हा घन पदार्थ असतो.त्यामुळे हवेतून सूर्याची किरणे जेंव्हा घन पदार्थ मधून जातात तेव्हा माध्यम बदलते व किरणांचे वक्रीकरण होते. यातूनच सूर्याभोवती खळं पाहायला मिळते.

सिंधुदुर्गात हे रिंगण प्रामुख्याने सावंतवाडी व वेंगुर्ले स्पष्ट पाहायला मिळाले. दरम्यान काहींनी ते आपल्या कॅमेरा कैद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here